परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल

राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आता यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. या चर्चेत मंत्री रावल यांनी अकोला जिल्ह्यातील…

Read More

शिंदखेड्यातील परसुळे गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय; नागरिक त्रस्त, अपघाताचा धोका

शिंदखेडा तालुक्यातील परसुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील दोंडाईचा-साक्री मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून अवजड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, शेतकरी, दुचाकीस्वार आणि गावकरी यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ह्या रस्त्यावरून दोंडाईचा रेल्वे डेपो येथून साक्री, पिंपळनेर, दहिवेल अशा शहरांकडे…

Read More

धुळे रेल्वे स्थानकावरील फलाट आणि रेल्वे गाडीत अंतर कमी करावे; मनसेची मुख्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

धुळे रेल्वे स्थानकावरील फलाट आणि गाड्यांमधील सुमारे दोन फूट अंतरामुळे प्रवाशांना गाडीत चढताना मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेषतः महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून यामुळे काही वेळा अपघातही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्य रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदन देऊन या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली…

Read More

राज्यातील 108 रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू; धुळेतील जेलरोड परिसरात धरणे आंदोलन

राज्यातील 108 रुग्णवाहिकांचे चालक आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेले असून, ‘समान काम, समान वेतन’ या मुख्य मागणीसह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जात आहे. धुळे शहरातील जेलरोड परिसरात वाहनचालकांनी धरणे आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. या पूर्वी 13 मे 2025 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे वाहनचालकांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी शासन व कंत्राटी कंपनी…

Read More

पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले पाटील यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.मुंबई येथील राजभवनात आज सकाळी झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.इन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून भाऊसाहेब ढोले हे ओळखले जातात. त्यांच्या नावावर पाच इन्काऊंटर आहेत. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जणांना त्यांनी जागीच कंठस्नान घातले.त्यांनी यापूर्वी गडचिरोली,पुणे,…

Read More

३६ वर्षांची अखंड परंपरा आजही कायम; विरदेलहून पंढरपूरकडे निघाली वारी

“आषाढी कार्तिकी भक्तगण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती…” या ओळी म्हणजे केवळ गाणं नसून, प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील श्रद्धेची आणि भक्तीची उत्कट भावना आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो वैष्णव भाविकांचा मेळा दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करतो. अशाच भक्तिभावाने विरदेल गाव आणि परिसरातील वारकऱ्यांचा जत्था आज दि. ३० जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन…

Read More

सामूहिक बलात्कारप्रकरणी पाचही आरोपींना जन्मठेप

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल धुळे : जिल्हा सत्र न्यायालयाने दि.26/6/2025 रोजी एका ऐतिहासिक निकालात साक्री तालुक्यातील बोनगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्वच पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.निलेश कलाल यांनी बाजू मांडली व त्यांना फिर्यादीच्या बाजूने अँड राहुल वाघ यांनी मदत केली.3 जून 2023 रोजी मध्यरात्री…

Read More

तापी नदीत ट्रक कोसळण्याची दुर्घटना सुदैवाने टळली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार उघड

शिंदखेड्यातील तापी नदीच्या पुलावरून एक ट्रक कोसळता कोसळता,,, थोडक्यात बचावल्याची धक्कादायक घटना आज दि २५ जून रोजी घडली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुकवद गावाजवळील हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला, तरी विभागाकडून कुठल्याही प्रकारची स्पष्ट सूचना अथवा चेतावणीचे फलक लावण्यात आले नव्हते. परिणामी,…

Read More

आमदार अनुपभय्यांमुळेच २० हजार रहिवाशांना हक्काचा `सात-बारा’

अमोल मासुळे : मिल परिसरातील नागरिकांतर्फे आमदारांचा नागरी सत्कार धुळे शहरातील मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी मोठ्या पाठबळाची गरज होती. ते पाठबळ शहराचे आमदार अनुपभय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच आज मिल परिसरातील २० हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळणार आहे, असे…

Read More

देशसेवेकरिता प्रशिक्षणातून घडवा सर्वोत्तम छात्रसैनिक – ब्रिगेडियर ए. जी. बरबरे

४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मार्गदर्शन धुळे (ता. २४ जून): छात्रसैनिकांच्या प्रशिक्षणाद्वारे देशसेवेची मूल्ये बिंबवून त्यांना सर्वोत्तम नेतृत्वासाठी घडवले पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीनगर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए. जी. बरबरे यांनी धुळ्यात केले. ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या भेटीवेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ब्रिगेडियर बरबरे म्हणाले, “देशाच्या जडणघडणीत…

Read More
Back To Top