भाटपुरा येथे अनुभव शिक्षा केंद्राचा प्रेरणादायी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला
भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) – अनुभव शिक्षा केंद्र, धुळे यांच्या वतीने भाटपुरा गावात आयोजित करण्यात आलेला प्रेरणादायी ओरिएंटेशन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात भाटपुरा तसेच परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या उत्स्फूर्ततेची झलक दाखवली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभव शिक्षा केंद्राच्या कार्याची, उद्दिष्टांची आणि युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर…
