जयहिंद हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रेरणादायी उपक्रम जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून कार्यक्रमाला विशेष उर्जा लाभली. योगादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध योगासने, ध्यानधारणा, यम-नियम यांची माहिती देण्यात आली. योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे…
