
महाराष्ट्र

पांझरा नदी पुलावर डीजे वाहन आणि दुचाकीचा अपघात ; दुचाकी चक्काचूर पण सुदैवाने जीवित हानी टळली
धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

अपघातानंतर अटक न करण्यासाठी मागितली लाच ; एक हवालदार ताब्यात एक फरार
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन दुचाकीस्वरांच्या झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. दुसऱ्या दुचाकीस्वारांवर घुंह नोंदविण्यात येत असताना २ पोलीस हवालदारांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरे फरार झालेत. तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर…

पिंपळनेरमध्ये रविवारी शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने रविवार, 1 डिसेंबर,2024 रोजी साई कृष्णा रिसार्ट, पिंपळनेर, साक्री येथे शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली,शासकीय सेवा व योजनांच्या मेळावानिमित्त पूर्वतयारी आढावा…

धुळ्यात थंडीचा जोर वाढला, स्वेटर खरेदी करणाऱ्यांची झाली गर्दी
धुळ्यात अचानक वातावरणात गारवा वाढलाय. थंडीने हुडहुडी भरतेय. तापमान साधारणतः १० डिग्री सेल्सिअस घसरले असून हे तापमान ८ ते ९ डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीही धुळ्यातले तापमान ७ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला असल्याने थंडीचा जोर आणखीच वाढलाय. वाढत्या थंडीमुळे रात्री लवकर शहरातील रस्ते निर्मनुष्य…

विधानसभा निकालानंतर मेहकरमध्ये दंगल ; 23 आरोपींना अटक, तणावपूर्ण शांतता
विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर मेहकर शहरात रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री दंगल उसळली . दोन गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करीत ५ वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली असून कलम 144 लागू केले आहे. आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर बुलढाणा…

भाजपने ईव्हिम मशीनमध्ये घोळ केला;पराभूत उमेदवारांचा आरोप
राज्यभरात भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आराेप उमेवार गितांजली कोळी यांनी केला आहे.साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गितांजली कोळी यांनी सांगितले की, गावातून तुम्हाला मतदान कसे पडले नाही म्हणून अनेक फोन…

पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात ; टेम्पोच्या धडकेने बस २० फूट दरीमध्ये कोसळली
पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खंडाळा घाट व खोपोलीदरम्यानच्या परिसरात एका टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने पुढे जाणाऱ्या बसला पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. त्यामुळे प्रवासी बस रस्त्याच्या कडेला २० फूट खड्ड्यात उलटून पडली. अपघातात ३ जण गंभीर असून ९ जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि खाजगी प्रवासी बस सांगोला…

शिरपूर शिंदखेड्यात होणार मतमोजणीच्या २४ फेऱ्या
महाराष्ट्र विधानसभेच्या धुळे जिल्हा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीची मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. प्रत्येक एका मतदारसंघासाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच…

धुळे जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९.७५ टक्के मतदान ; याठिकाणी होणार मतमोजणी…
धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी काल २० नोव्हेंबर रोजी पार पडल्या असून धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९.७५ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रात रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्याने हि सरासरी वाढून ६९ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळपासूनच केंद्रांवर पुरुषांप्रमाणेच महिलांचीही गर्दी दिसून आली. किंबहुना काही भागात लाडक्या बहिणीची…

निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांची साक्रीतील मतदान केंद्रांना भेट
धुळे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त, केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज दिनांक 19 नोव्हेंबर, 2024 रोजी साक्री तालुक्यातील सावरीमाल व डोंगरपाडा या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील पाहणी केली. धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होत आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता , केंद्रीय निवडणूक…