महाराष्ट्र
कापूस आयात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा आवाज
सत्यशोधक शेतकरी सभेचे तहसीलदारांना निवेदन केंद्र सरकारने १९ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. हा निर्णय ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. परंतु या निर्णयामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे सांगत सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे नवापूर तहसीलदारांना…
धुळ्यातील कष्टभजन मित्र मंडळाने वृंदावन येथून माती आणून साकारली गणेशाची आकर्षक मूर्ती
ण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंडळाने वृंदावन येथून आणलेल्या मातीतून गणेशाची आकर्षक मूर्ती साकारली असून त्यात गाईला देण्यात येणाऱ्या चाऱ्याचाही वापर करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून या मंडळात एकदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्तीचाच संकल्प कायम ठेवला जातो. याविषयी बोलताना मंडळाचे अध्यक्ष गिरीश…
साक्रीत ‘गाव तेथे समन्विका’ अभियानाची सुरुवात; अँड. पूनम शिंदे-काकुस्ते यांची अभिनव संकल्पना
भारतीय जनता पक्ष महिला आघाडी साक्री तालुक्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे समन्विका’ या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात करीत आहे. या अभियानाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती महिला समन्विकांच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थिनींपर्यंत थेट घराघरात पोहोचवली जाणार आहे. या अभियानाची संकल्पना भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष अँड. पूनम शिंदे-काकुस्ते यांची असून, त्याबाबत…
लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले
साक्री: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकारी मन्सीराम कळशीराम चौरे (रा. पिंपळनेर) आणि कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख (रा. साक्री) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या शेतजमिनीवर योजनांचे पैसे जमा करून देण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला १० हजारांची लाच मागितली होती,…
थकीत वेतन व पीएफ न दिल्यास उद्यापासून कामबंद आंदोलन
धुळे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा धुळे (प्रतिनिधी) : धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगार, एक वर्षाचा पीएफ आणि बोनस थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका व संबंधित ठेकेदार याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन त्वरित द्यावे, अन्यथा उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. धुळे महानगरपालिकेच्या…
धुळे जिल्हा डीजे चालक-मालक संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे परवानगीची मागणी
धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाने डीजे व साऊंड सिस्टमवर घातलेली बंदी शिथिल करण्याची मागणी धुळे जिल्हा डीजे चालक-मालक संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले. संघटनेने म्हटले आहे की, “डीजे व्यवसायावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अनेकांनी या व्यवसायासाठी बँक व खाजगी कर्ज घेतलेले आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर टोळीचा पर्दाफाश
धुळे: लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिर्यादी तुषार रमेश खैरनार (वय 35, व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. घटना अशी घडली:तुषार यांच्या लग्नाचे वय निघून जात असल्याने त्यांची आई स्थळ शोधत होती. दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी लग्न लावणाऱ्या…
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको; समता परिषदेचे भर पावसात आंदोलन
धुळे : धुळे शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली. उमेश महाजन यांनी सांगितले की, “आधीच ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती 17 टक्क्यांच्या आरक्षणात समाविष्ट आहेत. त्यात मराठा समाजाला समाविष्ट करण्याची…
जैताणेतील संघशक्ती व्यायाम शाळेचे बॅनर फाडल्याप्रकरणी आरोपी निष्पन्न; निजामपूर पोलिसांची कारवाई
धुळे – जैताणे गावातील संघशक्ती सार्वजनिक व्यायाम शाळेचे बॅनर व सीसीटीव्ही कॅमेरा फाडून तोडफोड करणाऱ्या घटनेचा छडा निजामपूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.राकेश भिका शेवाळे, रा. जैताणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ६.३० या वेळेत भवानी मंदिराजवळील व्यायाम शाळेच्या…
मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थींचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. २४ ऑगस्ट रविवारी साक्री तालुका शासकीय विश्रामगृह येथे यासंदर्भात प्रशिक्षणार्थ्यांची संघटनात्मक बैठक घेण्यात आली. शासनाला जाब विचारण्यासाठी पुढील लढ्याचे नियोजन या बैठकीत ठरविण्यात आले. ही योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने सुरू…
