
महाराष्ट्र

धुळ्यात मसाल्यात भेसळ करणारे रॅकेट उघड
एमआयडीसीत सुरु होता कारखाना, एलबीसीची मोठी कारवाई, अधीक्षक धिवरेंनी दिली भेट धुळे येथील अवधान शिवारात असलेलया एमआयडीसीमध्ये धाड घालून खाद्य पदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाल मसाल्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करणारे रॅकेटपोलिसांनी उघड केले आहे. यासंदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एमआयडीसीमधील कंपनीच्या एका भाड्याच्या गाळ्यात हा गोरख धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे आणि…

आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात यश….
शिंदखेडा तालुक्यातील एन. डी. मराठे विद्यालयाने राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.सलग दुसऱ्या वर्षी या अभियानात या शाळेने यश मिळवले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा-१ मध्ये तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तसेच नाशिक…

धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी
धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, गणपती मिरवणुकी दरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. परी शांताराम बागुल (वय 13),…

शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
शिंदखेडा – कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या इको कार व बोलेरो पिकअप व्हॅन यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल…

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची लाट
धुळ्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने दिले निवेदन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने २५ऑगस्ट रोजी होणारी पूर्वपरीक्षा रद्द केली. मात्र पुढची परीक्षा केव्हा होईल या बाबत अद्याप कोणतेही संकेत दिसत नाहीत. परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होते आहे. हि परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात यावी,अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने केली. जिल्हाधिकारी…

पावसाळ्यात वनभोजन व सहली काढल्यास कारवाई करणार, शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा
धुळे – सप्टेंबर महिना संपेपर्यंत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शाळांनी वनभोजन सह शैक्षणिक सहलीचे जिल्हा व जिल्ह्याबाहेर आयोजन करू नये यासाठी त्वरित मनाई आदेश काढावे, असे निवेदन धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे सह धुळे मनपा शिक्षण मंडळ पर्यवेक्षक गणेश सूर्यवंशी यांना देण्यात आले.राज्यातील पुणे वेधशाळेने काही दिवसापासून धुळे…

राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून आ.कुणाल पाटील यांचा गौरव
धुळे – महाराष्ट्र विधानसभेत आणि राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचा व मानाचा असलेला उत्कृष्ट आमदार पुरस्कार देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांना देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे धुळे ग्रामीण आणि खान्देशवासियांसाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आमदार म्हणून उत्कृष्ट भाषण या विभागात हा पुरस्कार आ.पाटील यांना सन 2023-24…

जुने कोळदे हातभट्टीवर दोंडाईचा पोलिसांची कारवाई…
दोंडाईचा- जुने कोळदे ता. शिंदखेडा येथे काटेरी झाडाझुडुपांच्या अडोक्यात विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूवर कारवाई करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी हातभट्टीची उग्र वासाची कच्ची दारू पन्नास रुपये लिटर प्रमाणे एकूण पाच ड्रम प्रत्येकी ड्रम मध्ये 20 लिटर कच्ची हातभट्टीची दारूचा मुद्देमाल कारवाई करत नष्ट करण्यात आला आहे. आकाश सुरतसिंग भिल रा. जुने कोळदे…

दहा वर्ष उशीरा का होईना 18 हजार कोटींच्या मनमाड इंदोर रेल्वेमार्गाला अखेर मंत्री मडळांची मंजुरी
12 डिंसेबरच्या अभूतपूर्व आंदोलनातील आंदोलकांचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मानले आभार मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान मोदी, स्व. राम जेठमलानी यांच्या प्रदीर्घ संघर्षातून 100 वर्षाचे स्वप्न साकार धुळे मालेगाव जिल्हयाचे भाग्य बदलण्याची शक्ती असलेल्या 18,036 हजार कोटी रूपयांच्या रेल्वेमार्गास आज केर्दीय मंत्री मंडळाने एक मुखी मान्यता दिली. तब्बल 45 वर्षापूर्वी स्वर्गीय शरद जोशींच्या अध्यक्षते खाली…

नरडाणा येथील मोफत महाआरोग्य शिबीराचा सुमारे दोन हजार रुग्णांनी घेतला लाभ
कामराज भाऊसाहेब युवामंच यांचा स्तुत्य उपक्रम दोंडाईचा । येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते कामराज निकम यांच्या मार्गर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवामंच यांच्या सहकार्याने नरडाणा येथे मोफत महाआरोग्य रोग निदान शिबीर घेण्यात आले.सदर शिबीराचा जवळपास २ हजार रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात मुंबई,नाशिक व धुळे येथील उच्चशिक्षित डॉक्टर उपस्थित होते.शिबिरात औषध उपचार देखील मोफत करण्यात…