
महाराष्ट्र

साक्री तालुक्यात तीन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
साक्री : दातरती, वाजदरे आणि बळसाणे शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी कारवाई केली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी धुळे यांच्या निर्देशानुसार तालुक्यात अवैध गुणखनिज वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे नेतृत्व साखरी तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी करत आहेत. शनिवारी…

अशोक नगर जलकुंभाच्या उभारणीला विलंब: शिवसेनेची आयुक्तांकडे लक्ष घालण्याची मागणी
प्रभाग क्रमांक १५ मधील अशोक नगर जलकुंभाच्या उभारणीचे काम तब्बल सात ते आठ महिन्यांपासून रखडले आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जलकुंभाचे काम थांबले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सौ. अमिता दगडे-पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या…

रावेर एमआयडीसी साठी जागा मिळावी -पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप अग्रवाल यांची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक धुळे जिल्हातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून आता जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी एमआयडीसीचा विकास करणे आवश्यक आहे. नरडाणा एमआयडीसी बरोबरच रावेर एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.रावेर एमआयडीसी च्या विकासासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…

पिंपळनेर खून प्रकरण: आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या आंबापाडा गावात ३० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या खून प्रकरणात आरोपी गुलाब बंडू बागुल यास धुळे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात मयत सुमनबाई बंडू बागुल यांच्या मुलाने, म्हणजेच आरोपी गुलाब बागुल याने दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र तिने पैसे नाकारल्याने रागाच्या भरात त्याने हाता-बुक्क्यांनी…

धुळे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक व बोगस माध्यमिक शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करा
शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी धुळे – बोगस शिक्षक भरती व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना हाताशी धरून, संस्था चालकांनी घातलेला हैदोस, संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना माझे जाहीर आवाहन आहे. अशा नकली चौकशांचे नाटक बंद करा ! दोषी व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, माजी आमदार…

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत ८०० नागरिक घेणार रामल्लाचे दर्शन
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानकावर होणार शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांची अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने तीर्थयात्रा 26 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ धुळे रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल…

बोराडी ग्रामपंचायतीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार,
बोराडी ग्रामपंचायतीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीने बाजी मारली असून ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे नागरी सेवा दिनानिमित्त पार पडलेल्या…

बालकांच्या अनाधिकृत संस्थांविरोधात होणार कठोर कारवाई
धुळे जिल्ह्यात व आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा. अशा अनाधिकृत संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. असे राज्याच्या महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर…

राजेंद्र बंब प्रकरणात सरकारी वकील बदलण्याची मागणी
तक्रारदार जयेश दुसाणे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन धुळे – आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सावकारी प्रकरणात आरोपी राजेंद्र जिवनलाल बंब व संजय जिवनलाल बंब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, या प्रकरणातील तक्रारदार जयेश उमाकांत दुसाणे यांनी सदर गुन्ह्यातील सरकारी वकील बदलून MPSC मार्फत नियुक्त सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी करत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन…

धुळ्यातील आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद, हजारोंवर उपचार
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशनचा उपक्रम धुळे : सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्याकरिता आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. धुळे शहरात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…