बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; शिरपूर पोलिसांची कारवाई
शिरपूर तालुक्यातील वाडी गावात बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त करण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किस्मत भगवान कोळी (वय ४९) याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्याचा मुलगा समाधान कोळी फरार झाला आहे. गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या…
