शारदिय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात, एकवीरा देवी मंदिरात भाविकांची गर्दी
धुळे : आजपासून महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ, खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिर मध्ये शारदिय नवरात्र उत्सवाला विधिवत सुरुवात झाली. मंदिरात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, पूजा व घटस्थापना करून उत्सवाचे औपचारिक विधी पार पडले. मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले की, नवरात्राच्या आगामी दहा दिवसांत येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे….
