जळगाव जिल्ह्यात शोककळा : एका कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील वरखेडे गावात घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतात लावलेल्या विजेच्या तारेच्या कुंपणामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून, दीड वर्षांची एक मुलगी मात्र सुदैवाने बचावली आहे. घटना कशी घडली? मध्यप्रदेशातील विकास रामलाल पावरा (३५) हे कुटुंबासह रोजगारासाठी एरंडोल तालुक्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास…
