
लाच घेताना औषध निरीक्षक व खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत एका औषध निरीक्षकासह खाजगी इसमाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच स्वीकारताना हे दोघेही एसीबीच्या सापळ्यात अडकले. काय आहे संपूर्ण प्रकरण? शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करण्यासाठी एका व्यक्तीने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता….