
धुळ्यात बांगलादेशी नागरिकांची अटक; शिवसेना उबाठाने केली कोंबिंग ऑपरेशनची मागणी
धुळे शहरातील पोलिसांनी, प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धुळे शहरात बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमीवर कोंबिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी करत आज दिनांक २४ डिसेंबर रोजी शासनाला निवेदन दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई धुळे शहरातील जातीय तणाव आणि अवैध रहिवाशांच्या वाढत्या संख्येमुळे…