महाराष्ट्र
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त धुळे मनपात चित्रकला स्पर्धा; शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिकेतर्फे शहरभर विशेष स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या कल्पकतेतून स्वच्छतेचा…
साक्रीतील जैताणे येथील आई भवानी देवीच्या नवरात्र उत्सव यात्रेची जय्यत तयारी
धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या साक्री तालुक्यातील जैताणे गावात ग्रामदैवत आई भवानी देवीच्या नवरात्र उत्सवला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. या नवरात्र काळात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, नवसपूर्ती, आरत्या आणि सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय होऊन जाईल. रोहिणी नदीकाठी वसलेले आई भवानी देवीचे हे भव्य आणि जागरूक देवस्थान शेकडो वर्षांपासून यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर जिर्णोद्धार समिती,…
आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरणार
धनगर, बंजारा समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये; आदिवासी टायगर सेना आक्रमक महाराष्ट्रातील आदिवासी समाज आपले मुलभूत हक्क व संविधानाने दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करीत आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीप्रमाणे आणि 1950 च्या राष्ट्रपती आदेशानुसार अनुसूचित जमातींना आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. या आदेशात कोणत्या जमाती आदिवासी म्हणून मान्य आहेत, याचा स्पष्ट…
साक्रीतील सेतू केंद्रांमध्ये अवाजवी फी आकारणी; ग्राहक पंचायतची तहसीलदारांकडे तक्रार
साक्री तहसील अंतर्गत कार्यरत असलेल्या सेतू केंद्र चालकांकडून नागरिकांकडून दाखले व शासकीय कागदपत्रांसाठी अवाजवी फी आकारली जात असल्याचा गंभीर आरोप ग्राहक पंचायत महाराष्ट्रने केला आहे. या संदर्भात तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. ग्राहक पंचायतच्या साक्री शाखेकडे आलेल्या तोंडी तक्रारी व व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे नागरिकांनी सांगितले की, दाखल्यांसाठी १०० रुपये किंवा त्याहून अधिक शुल्क आकारले जात…
बुद्धगया, महू व दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवा
भारतीय बौद्ध महासभेचे जनआक्रोश आंदोलन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत जनआक्रोश आंदोलन छेडले. या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये, 1949 चा घटनाबाह्य बोधगया मंदिर अधिनियम रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवावे, अशी पहिली मागणी करण्यात…
स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा धुळ्यात शुभारंभ
धुळे (ता. १७ सप्टेंबर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशपातळीवर सुरू करण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा धुळे जिल्ह्यात आज शुभारंभ झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर सौ. जयश्री अहिरराव व उपमहापौर सौ. कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर तसेच आरोग्य विभागाचे…
बालकांमध्ये श्वसन आजारांचा संसर्ग वाढला; बालरोग तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
धुळे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता आणि परिसरात साचलेले पाणी लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. परिणामी शालेय मुलांमध्ये ‘फ्लू’ तर एक वर्षाखालील बालकांमध्ये रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (आरएसव्ही) या श्वसन संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे धुळे येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी सांगितले. पावसाळ्यात आधीच डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांनी नागरिकांना त्रस्त…
प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेवर शिवसेनेची एकमेव हरकत; धुळे महानगरप्रमुख धीरज पाटील यांची ठाम भूमिका
धुळे शहरातील प्रभाग रचनेबाबत नोंदवलेल्या हरकतींमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी मांडलेली एकमेव हरकत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रमुख रस्ते, पूल व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या दीर्घकालीन तक्रारी लक्षात घेऊन पाटील यांनी प्रशासनापुढे मुद्दा ठामपणे उपस्थित केला आहे. सध्या असलेल्या १९ प्रभागांच्या चौथ्या सीमेला जोडणाऱ्या लगतच्या प्रभागांचे प्रमुख रस्ते व स्थळे…
साक्री पंचायत समिती ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी’ सज्ज
साक्रीतील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कामगिरीच्या आधारे अव्वल गुण मिळवणाऱ्या संस्थांना १५ लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंतचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते….
धुळे महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा संताप
रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा धुळे शहरातील नेहरूनगर परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिक नागरिक व व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज संतप्त नागरिकांनी धुळे महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली….
