
महाराष्ट्र

पाण्याची मोटर चोरी करणारे अट्टल चोरटे जेरबंद
शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६८ हजार किमतीच्या ५ मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. शेतकरी प्रियदर्शन काशिनाथ बागले यांची ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटार चोरीस गेल्याची तक्रार ३१ जानेवारी २०२४ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक…

दोंडाईचा पोलिसांची कामगिरी : ५ दिवसात ७ ठिकाणी कारवाया करून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून पोलिसांनी हि कारवाई केली.दोंडाईचा शहरातील मेहेतर कॉलनी भागात सुशीला अशोक नेतले हि महिला हातभट्टीची दारूविक्री चा व्यवसाय करत होती. तसेच गोपाळपुरामधील दारूविक्री करणारा महेंद्र शिवराम पवार, निमगूळ गावातील रेखाबाई नानाभाऊ भील, कुरुकवाडे…

प्रा.दिनेश गुंड यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून ६२ व्या वेळा निवड
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने तिराणा (अल्बेनिया) युरोप येथे दिनांक 20 ते 27 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी (पंच ) म्हणून निवड करण्यात आली. हि निवड भारतीय कुस्ती संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होण्याची ही त्यांची ६२ वी वेळ आहे.जागतिक कुस्ती संघ…

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आमदार सुरेश धस हे मनोज जरांगे यांच्या भेटीला
धस आणि जरांगेच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण …मध्यरात्रीनंतर अंतरवाली सराटीत असं काय घडलं?महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी यादी निघण्यापूर्वी भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा तास या दोघात बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट…

निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी पाच जणानांच मिळणार प्रवेश…
धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघांसाठी 22 ते 29 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात 5 जणानांच प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3…

न्यायदेवतेच्या डोळ्यांवर आता पट्टी नाही ; कायदा ‘आंधळा’ नाही
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे आणि तिच्या एका हातातील तलवार काढून राज्यघटना देण्यात आली आहे. जेणेकरून देशात कायदा आंधळा नाही, असा संदेश जाईल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयात हा पुतळा बसवण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या वाचनालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. अगोदर डोळ्यावर पट्टी असलेली…

लांघाणे गावात डायरियाचे थैमान, महिलेचा मृत्यू , १८ जणांना लागण
दोंडाईचा – शिंदखेडा येथे तेरा जणांना डायरिया सदृश्य रोगाची लक्षणे दिसून आली. त्यातील उजनेबाई छोटू भिल ( वय ३५ रा.लंघाणे) दोंडाईचा येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. सहा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर उर्वरित रुग्णांवर लंघाणे येथे आरोग्य उपकेंद्र नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार करून सोडण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य…

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी
धुळे: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील निर्गमित केले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहितेचे पालन कसे करावे?
धुळे : प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते. ही प्रक्रिया निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर ही प्रक्रिया सुरू होते. निवडणूक आयोग विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच निवडणूक आचारसंहिता लागू करते. देशात निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणूक घोषित झाल्यापासून…

चोरट्याकडून १८ मोबाईल व मोटारसायकल जप्त , रोकडोबा जवळची घटना
धुळे लळींग येथील रहिवासी अजय सखाराम गवळी हे रोकडोबा येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा मोबाइल लाम्बवण्याची घटना घडली या घटनेचा तपास करताना तालुका पोलिसांनी मालेगाव येथील २ संशयितांपासून तब्बल १८ मोबाईल , १ मोटारसायकल असे १ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. मोबाइल चोरीची…