महाराष्ट्र
महसूल दिनी उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला गौरव
धुळे, दिनांक 1 ऑगस्ट, : जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे ‘महसूल सप्ताहा’चा शुभारंभ जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते महसूल संवर्गातील कार्यरत उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करुन अत्यंत उत्साहात करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी…
धुळे पोलिस दळणवळण विभागाला राज्यात दुसरा क्रमांक; तांत्रिक कार्यक्षमतेची दखल
धुळे : पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात धुळे विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत पश्चिम विभाग, पुणेमधील २८ युनिट्सपैकी दुसरा क्रमांक मिळवला आहे. हे मूल्यांकन अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागातील तांत्रिक कार्यक्षमता, नविन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि प्रशासकीय सुसूत्रता या…
धुळे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळणार? – आमदार अनुप अग्रवाल यांची मागणी, उद्योगमंत्र्यांची तात्काळ हालचाल
औद्योगिक वसाहतीतील दुरवस्थेची दखल; प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे निर्देश, उद्योजकांमध्ये समाधानाची भावना धुळे शहरातील अवधान येथील औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निधीच्या मागणीसाठी निवेदन दिले. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव मागवण्याचे निर्देश दिले आहेत. धुळे हा…
मंजूर कामांचे श्रेय घेऊ नका; आमदारांनी नवा निधी आणावा – अक्कलपाडा संघर्ष समितीचा टोला
धुळे – धुळे तालुक्यातील कनोलीमध्यम प्रकल्प, पुरमेपाडा लघु प्रकल्प, कुळथे व मांडळ लघु प्रकल्प तसेच सय्यदनगर फड बंधारा यांसारख्या सिंचन योजनांच्या दुरुस्ती व कालव्यांच्या नुतनीकरणासाठी प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळवण्यात माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा सक्रिय पाठपुरावा होता, असा दावा अक्कलपाडा संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात श्री. पाटील यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जलसंपदा विभागाचे…
धुळे जिल्ह्यातील नवविवाहित दाम्पत्याचा हृदयद्रावक अंत; चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने किरकोळ वादातून थेट आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावरून दोघांनी वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण हादरून गेला आहे, तर मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील असलेल्या या तरुण दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांच्या गावीही शोककळा पसरली आहे. नाव – नीलेश रामदास…
राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या,अजीज शेख धुळे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
धुळे – राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, या प्रशासकीय बदल्यांमध्ये अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अजीज शेख हे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यांची धुळे येथे बदली करण्यात आली असून त्यांनी लवकरच कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. राज्यात…
भिल कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा निकाल – तीन आरोपींना दहा वर्षांची सक्त मजुरी
दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावात २०१७ मध्ये घडलेल्या एकाच कुटुंबातील सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणात धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्यात न्यायालयाने गावच्या तत्कालीन पोलीस पाटलासह तिघांना प्रत्येकी 10 वर्षांची सक्त मजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी हा निर्णय…
नकानेतील ग्रामस्थ गावठाणातील आरक्षणाविरोधात आक्रमक, गुरेढोरांसह आंदोलनाचा इशारा
धुळे शहराच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्यात नकाने गावठाणावर टाकलेल्या आरक्षणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी आज महानगरपालिकेत झालेल्या सुनावणीदरम्यान आपली हरकत जोरदारपणे नोंदवली. हा आराखडा कोणताही अभ्यास न करता लादला असून, तो रद्द न केल्यास कुटुंबीय आणि गुरेढोरांसह महानगरपालिकेत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा आणि न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नकाने ग्रामस्थांनी निवेदन केले…
शिरपूरच्या दोघांनी तापीत घेतली उडी, पती-पत्नी की प्रेमी युगुल ? गूढ
धुळे जिल्ह्यातील दभाषी गावाजवळ आज २९ जुलै रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. दोन व्यक्तींनी तापी नदीत अचानक उडी घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांचे नाते नेमके काय आहे ? ते पती-पत्नी आहेत की प्रेमसंबंधित युगुल ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघंही शिरपूर तालुक्यातील असल्याची माहिती पुढे येत आहे. माहिती मिळताच नरडाणा पोलीस…
जगदीश ठाकरे हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा मोर्चा
15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेरावाचा इशारा धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येचा निषेधार्थ आज धुळ्यातील आदिवासी बांधवांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जगदीश ठाकरे यांच्या खून प्रकरणी मुख्य सुत्रधार गोविंद शिवाजी पाटील याला अटक करा, सर्व आरोपींना फाशी द्या तसेच पिडीत ठाकरे परिवाराला तत्काळ 50 लाखांची आर्थिक मदत द्या,…
