
महाराष्ट्र

शेतकरी विरोधी ठरवत काँग्रेसने केला अर्थसंकल्पाचा निषेध, धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
धुळे – नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही. कर्जमाफीबद्दल शब्द नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. यामुळे आज २६ जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामकांत…

‘शिक्षण सप्ताह’ निमित्ताने “जयहिंद” मध्ये कृतीमधून क्रीडा दिवस साजरा
धुळे : (२४ जुलै) येथील जयहिंद हायस्कूल, धुळे येथे शिक्षण सप्ताहातील एक दिवस हा क्रीडा दिवस म्हणून प्रत्यक्ष जयहिंद जलतरण तलाव स्थळी कृतीमधून साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस्. व्ही. बैसाणे, उपमुख्याध्यापक श्री. एस्. डी. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालक श्री. डी. व्ही. निकम यांनी श्री. वाय. एस्. चव्हाण व श्री. प्रितम…

आयपीएस अधिकारी रहमान यांचे उमेदवारीचे स्वप्न पुन्हा भंगले..!
स्वेच्छा निवृत्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली धुळे I लोकसभा निवडणुकीत धुळ्यातून वंचित बहुजन आघडीतर्फे उमेदवारी करणारे आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांचे पुन्हा उमेदवारी करण्याचे स्वप्न सध्या तरी भंगले आहे. कारण, उच्च न्यायालयाने रहमान यांनी केलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीची याचिका फेटाळून लावली आहे. स्वेच्छानिवृत्तीची मागणी फेटाळण्याच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार…

अमित शाह हे तडीपार गृहमंत्री – जयंत पाटील यांचा घणाघात
शिंदखेड्यात राष्ट्रवादी निष्ठावंतांचा मेळावा दोंडाईचा । प्रतिनिधीदेशात 400 पार करण्याचा नारा देणाऱ्यांना 240 वर थांबवले यात खरा लोकशाहीचा विजय झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदखेडा येथे मन मिरा मंगल कार्यालयात निष्ठवांत कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.. महाविकास आघाडीच्या काळात सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला…

धुळे ग्रामीण मतदार संघात शिवसेना करणार झंझावात,२००९ची पुनरावृत्ती होऊन भगवा फडकेल,असा विश्वास
धुळे, प्रतिनिधी I धुळे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा झंझावात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. हिलाल माळींच्या नेतृत्वात शिवसैनिक सज्ज होत असून २००९ साली झाला तसा चमत्कार यावेळी घडेल आणि विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणवर पुन्हा एकदा भगवा फडकेल. असा विश्वास माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हिलाल माळींचे कार्य जोमाने सुरु असल्याने जनता त्यांना नक्की…

दोंडाईचा येथे बाह्मणे रेल्वे गेट नजीक सर्व्हिस रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण,
ठेकेदारांच्या मनमानीवर वचक कुणाचा ? दोंडाईचा । प्रतिनिधीधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा येथे बाम्हणे रेल्वे गेट नजीक उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने सर्व्हिस रोड अतिशय खराब झाला आहे.. या रस्त्यावर वाहन चालवणे तर अशक्यच आहे… पायी चालणे देखील अवघड बनले आहे. ठेकेदार लक्ष देण्यास तयार नाही, अशी वाहनधारकांची तक्रार आहे. मागच्या वर्षी याच रस्त्यासाठी शिवसेना…

निवृत्त शिक्षकांची पुंजी घेऊन चोरट्यांचा पोबारा
धुळे : प्रतिनिधी I शहरातील राजगुरु नगरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. यात बारा ग्राम सोने- चांदीसह, पंधरा हजार रोख रुपये लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत राजगुरुनगर प्लॉट नंबर 39/41 येथे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रामचंद्र धात्रक हे राहतात. रात्री चोरटयांनी घराचा काडी कोयंडा…

आधीच कोठडीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन पुन्हा ठोकल्या बेड्या
धुळे- ( प्रतिनिधी ) धुळे शहरा लगत सुरत बाय पास रस्त्यावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस लुटणाऱ्या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. दादाभाऊ बारकू पारधी रा. कुंडाणे हे २५ जून रोजी रात्री ११ वाजता सुरत बाय पास रस्त्याने सिव्हिल हॉस्पिटलला जात असताना मागून मोटारसायकल ने आलेल्या…

देशाची सुरक्षितता धोक्यात, धुळ्यात आतंकवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध
धुळे – देशातील वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या निषेधार्थ आज धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.गेल्या दीड महिन्यांपासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी आपला तिसरा कार्यकाळातील पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच दहशतवादी कारवायांनी डोके वर काढले. गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते…

चिमठाणे गावात मूलभूत समस्यांचा महापूर;सरपंचांचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
शिंदखेडा – तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या 3 वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये ना गटारीचे कामे करण्यात आली, ना रस्त्यांची, त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत. तीन वर्षापासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्न करिता मागणी करीत आहे, मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे…