महाराष्ट्र
संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त चिमुकल्यांची भव्य दिंडी
धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुपडू आप्पा कॉलनी येथील सावता माळी प्राथमिक शाळेत संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संत सावता माळी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या पूजनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादर करत परिसरात ऊर्जा आणि भक्तिभावाची लहर पसरवली. विशेष म्हणजे लहानग्यांनी संतांची…
धुळे शहरात राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन! चार हजारहून अधिक बाटल्या जमा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात शहरातील एकूण ४,३१३ बाटल्या रक्तसंकलन झाले असून, सर्वाधिक रक्तसंकलन करून खंडेराव महाराज मंदिर केंद्राने पहिला क्रमांक पटकावला. शहरातील जुन्या आग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिर केंद्राने ५७३ बाटल्या रक्तसंकलन करून या शिबिरात आघाडी घेतली. या केंद्राचे आयोजक एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, विकी…
साक्रीत जुन्या वादातून गोळीबार, घटनेमुळे परिसरात खळबळ, संशयित फरार
साक्री-नवापूर महामार्गावरील विमलबाई कॉलेज समोर जून्या वादातून हमरीतुमरीवर येऊन दोन गटात वाद झाला. यावेळी एका तरुणाने हवेत गोळी झाडून धाकवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. साक्री शहरातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न जटिल झाला आहे. प्राप्त माहिती नुसार गोळीबार करणारा इसम व आष्टाने गावातील काही तरुण यांच्यात जुना वाद आहे. त्याच वादाची कोर्टात केस चालू असून…
दोंडाईचा येथे जिल्हास्तरीय महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
तरुणांसाठी नोकरीचे नवे दालन खुले – पालकमंत्री जयकुमार रावल “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिक, कृषी, आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांनी या नव्या संधींचा लाभ घेत स्वतःच्या करिअरसाठी नव्या दिशा निवडाव्यात,” असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. दोंडाईचा येथील शिक्षण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साक्रीत महारक्तदान शिबिर; ६५ बाटल्यांचे संकलन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा साक्री तालुक्याच्यावतीने आज, २२ जुलै रोजी साक्री येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ६५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. हे शिबिर भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांच्या संयोजनातून सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या आवारात पार पडले. रक्तदान शिबिरात मोठ्या…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भव्य आरोग्य शिबिर; ३८१५ नागरिकांची तपासणी, २७० बाटल्या रक्तदान
धुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील मिल परिसरात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आणि ए.बी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात एकूण ३८१५ नागरिकांची मोफत तपासणी व निदान करण्यात आले, तर रक्तदान शिबिरात २७०…
साक्री | नगराध्यक्ष पदासाठी उषा पवार यांचा अर्ज दाखल
भाजप व शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत नामनिर्देशन प्रक्रियेची पूर्तता साक्री : साक्री नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी आज सौ. उषा अनिल पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला. या वेळी भाजप व शिवसेना (शिंदे गट)…
वाढीव घरपट्टीविरोधात ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन; महापालिकेसमोर बिले जाळून निषेध
धुळे : धुळे महापालिकेने नागरिकांना पाठवलेली वाढीव घरपट्टीची बिले हे शहरवासीयांच्या खिशाला कात्री लावणारे असून, याच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी घरपट्टीची बिले जाळत महापालिकेच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, “शहरात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा मिळत नसताना, महापालिकेने तीन…
धुळ्यात अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
सुनील नेरकर यांनी दिली माहिती : धुळ्याला पहिल्यांदाच मिळाला मान, २० जुलै २०२५ रोजी बैठक धुळे : अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या रविवार दि. 20 जुलै रोजी शहरातील हॉटेल गोल्डन लिफ येथे होणार आहे. पहिल्यादाच या बैठकीचा मान धुळ्याला मिळाला असून त्यात नवीन पदाधिकारी नियुक्तीसह विविध विषयांवर विचारमंथन देखील होणार…
राज्याच्या कांदा धोरण समितीवर शंकरराव खलाणे यांची नियुक्ती
राज्यातील कांदा उत्पादन, बाजारभाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत कांदा धोरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीवर नेर (ता. धुळे) येथील कांदा तज्ज्ञ, निर्यातदार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार…
