महाराष्ट्र
निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ,दोन हवालदार निलंबित!
धुळे जिल्हा पोलिस दलात मोठी कारवाई झाली असून जवळपास २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली असून निलंबित हवालदारांची नावे महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे अशी आहेत. मुद्देमाल जमा करण्याबाबत वरिष्ठांनी…
5 डिसेंबर ला राज्यभरातील सर्व शाळा बंद
शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन. राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी पत्रका द्वारे सदर…
सासऱ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर करणारा जावई अटकेत; निजामपूर पोलिसांची धडक कारवाई
निजामपूर पोलिसांनी साक्री तालुक्यातील रोजगाव येथे झालेल्या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या जावयासह दोघांना अटक करून महत्त्वाची कारवाई केली आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सोमा सरगर यांनी आपल्या जावयाकडे मुलीच्या गर्भपाताबाबत विचारणा केली होती. याच रागातून जावई गोरख लखा कोळपे, त्याचा भाऊ आणि आई यांनी मिळून सोमा सरगर यांना बेदम मारहाण…
भाजपा साक्री मंडळात संविधान दिन उत्साहात साजरा; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांना अभिवादन
साक्री येथे भारतीय संविधान दिन भाजपा साक्री मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाचे औचित्य साधण्यात आले. या प्रसंगी बोलताना ना. रावल म्हणाले की,…
निजामपूर पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड
निजामपूर (ता. मालेगाव) — अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला निजामपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणात आरोपीकडून सोन्या–चांदीचे दागिने, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹1,86,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेचा तपशील तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १४ वर्षे ६ महिने २४ दिवस वयाची मुलगी (काल्पनिक नाव –…
६० वाहनचालकांची अल्कोहोल तपासणी; नियमभंगास कठोर कारवाईचा इशारा
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मोहीम धुळे (प्रतिनिधी) – शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित राहावा यासाठी धुळे पोलिसांकडून आज (दि. २६ जून २०२५) दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत व्यापक आणि अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. शाळा सुटण्याच्या वेळी शहरातील जे. आर. सिटी स्कूल, सेंट अँथनी स्कूल, कमलाबाई हायस्कूल, कनोसा स्कूल, श्रीजी स्कूल आणि नूतन पाडवी…
पिंपळनेर नगरपरिषदेतील भाजप उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे निधन; प्रभाग 2B ची निवडणूक बरखास्त
पिंपळनेर शहरात सुरु असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या उत्साहात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. भाजपा उमेदवार कुसुमबाई खंडू पाथरे (वय 75) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पाथरे कुटुंबियांसह भाजप कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुसुमबाई पाथरे या दिवंगत आबासाहेब खंडू पाथरे यांच्या आई असून, यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 2B मधून उमेदवार म्हणून रिंगणात…
डोंगराळेतील बालिकेवरील अत्याचार प्रकरण : आरोपीला सहा महिन्यांत फाशी द्यावी – निजामपूर-जैताणे ग्रामस्थांची एकमुखी मागणी
निजामपूर-जैताणे (ता. मालेगाव) – डोंगराळे गावात घडलेली अल्पवयीन बालिकेवरील क्रूर अत्याचार आणि हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याची भावना व्यक्त करत, दोषी आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांनी केली आहे. या निषेधार्थ निजामपूर-जैताणेत व्यापारी असोसिएशन, आझाद चौक मित्र…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांचा सक्रिय पवित्रा; सोशल मीडियावर 24×7 सायबर पेट्रोलिंग सुरू
धुळे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धुळे सायबर पोलीस स्टेशनकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापक सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. चुकीची माहिती, अफवा, द्वेषपूर्ण भाषण, धमकी, बदनामीकारक मजकूर, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे पोस्ट तसेच लोकशाहीला धोका पोहोचवणारे कोणतेही कंटेंट प्रसारित होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्ह्यातील शांततेला…
धुळे : सोनगीर टोलनाक्यावर गुटख्याचा कंटेनर पकडला; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी उधळून लावली. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता महामार्ग क्रमांक ३ वरील सोनगीर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचला होता. दरम्यान, गुडगावकडून धुळ्याकडे येणारा एक कंटेनर संशयित वाटल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तपासात कंटेनरमध्ये पाच मोठ्या बॉक्समध्ये सुमारे १९५ किलो वजनाचा सुगंधित…
