धुळे येथे गृहरक्षक दलाचा २९ वा वर्धापन दिन साजरा.

गृहरक्षक दलातर्फे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले फळ वाटप धुळे जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचा २९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहात वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज १६ डिसेंबर रोजी  धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.         गृहरक्षक दलाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहात श्रमदान , वृक्षारोपण आणि…

Read More

पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी ;

( प्रतिनिधी : निलेश सावळे)‌   साक्री  पोलीस स्टेशनचे नवीनच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांचा शरद चव्हाण या पत्रकाराशी वाद झाल्यानंतर त्यासंदर्भात समज गैरसमज दूर करण्यासाठी व  चर्चा करण्यासाठी दुसरे दोन पत्रकार गेले असता त्यांच्याशीही हुज्जत घालत नव्याने वाद निर्माण केला. याप्रसंगी उपस्थित असलेले दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांना त्यांच्या अपंगत्वावर व्यंगात्मक टीका करत पाय तोडण्याची धमकी…

Read More

धुळ्यात प्रवाशांना लुटणारा सराईत चोरटा गजाआड; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळ्यात अंधाराचा फायदा घेत प्रवाशाला लुटणारा सराईत चोरटा मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी धुळे शहरात अंधाराचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यातील जी.टी.पी. स्टॉप येथे बसची वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल आणि रोकड हिसकावून चोरट्याने पोबारा केला होता. या प्रकरणी वेगाने तपास करत पोलिसांनी…

Read More

कोट्यवधींची वसुली करणाऱ्यांवर कारवाईऐवजी बढती ? व्ही. के. शिवदास यांचा ‘शुक्राचार्य’ कोण?

धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरण: शेतकरी संघटनेची बडतर्फीची मागणी मागणी महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आली असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता… धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी व्ही. के. शिवदास यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचे…

Read More

आयजींचे पथक असतानाच दोंडाईचात पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडले

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ९ ते १२ डिसेंबरदरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. याच दरम्यान दोंडाईचा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोंडाईचा शहरातील कोठारी पार्क परिसरातील हस्ती भवनजवळ राहणारे महेंद्र ठाकूर हे पोलीस कर्मचारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते मागील १४ दिवसांपासून नाशिक येथे त्यांच्या वडिलांच्या वैद्यकीय…

Read More

साक्री : दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर आष्टाने येथे श्री दत्तात्रेय सेवा आश्रमाचे भूमिपूजन

साक्री तालुक्यातील आष्टाने येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर श्री दत्तात्रेय सेवा आश्रमाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दत्तात्रेय दरबार, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टाने येथील आश्रम प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या आश्रमाच्या माध्यमातून गोशाळा, गोरगरीबांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्याचा संकल्प आश्रमाचे महंत 1008 अवधूत गिरी कल्याणगिरी महाराज यांनी केला आहे. हिंदू धर्माचा प्रसार…

Read More

धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग यांचे निधन

धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुद्वारा साहिबचे प्रमुख बाबा धीरजसिंग यांचे आज निधन झाले. गेल्या आठवड्यात गुरुद्वारातीलच एका सेवेकऱ्याने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Read More

साक्रीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

साक्री शहरातील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनाची अत्यंत आदरपूर्वक आणि भावपूर्णरीत्या नोंद करण्यात आली. महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचा कोहिनूर अशी ओळख असलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाजबंधूंनी कोटी-कोटी नमन केले. यावेळी उपस्थितांनी त्रिशरण आणि पंचशीलचा स्वीकार करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानवंदना दिली. कार्यक्रमास…

Read More

आदिवासी विकास विभागातील प्रकल्पस्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा उत्साहात पार — १५४५ विद्यार्थी खेळाडू सहभागी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत प्रकल्पस्तरीय दोन दिवसीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा 5 आणि 6 डिसेंबर रोजी नांदवन (ता. साक्री) येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या. प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि सुकापुर या चारही गटांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण 1545 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या…

Read More

साक्रीत 79 वा होमगार्ड दिन धुमधडाक्यात साजरा!

साक्री शहरात 79 वा होमगार्ड दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांनी रूट मार्च काढत कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम साक्रीतील होमगार्ड कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाला डीवायएसपी संजय बांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच साक्री पोलीस स्टेशनचे पीआय दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद रौंदळ, तालुका होमगार्ड समादेशक मनोज…

Read More
Back To Top