धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार निलंबित; टोल नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ

धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार मुकेश यशवंत वाघ (पोहवा/१३‍०४) यांना शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. धुळे-चाळीसगाव रोडवरील बोरविहीर पथकर नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून पथकर कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. घटना कशी घडली?२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.१९ वाजता ही घटना घडली. बोरविहीर टोल नाक्यावरून MH-०४-FF-१३८०, MH-१२-KE-४८०८ आणि MH-०२-CZ-८२५८…

Read More

२५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींनी उजळले निजामपूर-जैताणे

निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी (सन १९९८-१९९९) च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनंतर स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाने शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा मिळाला तर अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दाटले. या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष अंजीचंद्र शाह होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.आर. गावित, उपमुख्याध्यापक नितीन शाह, तसेच डि.जे….

Read More

साक्रीत गुरु-शिष्य नात्याला उजाळा – 2002 च्या बॅचचा भावनिक गुरुशिष्य मेळावा

साक्री तालुक्यातील कासारे येथील वसंतराव दादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 2002 च्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या शुभ पर्वावर विद्यालयात भावनिक गुरु-शिष्य मेळावा आयोजित केला. तब्बल तेवीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुने दिवस उजाळले. या मेळाव्यात अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्रथम प्राचार्य बी.एम. भामरे हे होते. त्यांनी आपल्या…

Read More

धुळे जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची विशेष मोहीम, चार आरोपींवर कारवाई

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत २६ आरोपीना तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार असूनही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून येणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून कारवाई केली आहे. चार आरोपीना अटक करून या पैकी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कलम 56 अन्वये जिल्ह्यातील…

Read More

वडजाई सौंदाणे रस्त्याची अक्षरशा चाळन; वडजाई ग्रामस्थ आक्रमक

लोकप्रतिनिधींचे अनोख्या पद्धतीने मानले विशेष आभार… धुळे | तालुक्यातील वडजाई-सौंदाणे ते बाबुळवाडी मार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला असून, रस्त्याची चाळण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि धूळ यामुळे ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदारांपर्यंत तक्रारी केल्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही….

Read More

ग्लोबल हॅंडवॉशिंग डे साजरा : निजामपूर-साक्रीतील 887 विद्यार्थ्यांचा सहभाग‘सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर ५’ प्रकल्पांतर्गत उपक्रम

निजामपूर (ता. साक्री) — जागतिक हॅंडवॉशिंग डेच्या निमित्ताने निजामपूर येथील इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालय, आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ विद्यालयात एकत्रितपणे स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल 887 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम प्लॅन इंडियाच्या ‘सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर ५’ या प्रकल्पांतर्गत रेकिटच्या सहकार्याने, तसेच धुळे जिल्हा शिक्षण,…

Read More

धुळ्यात पारोळा रोडची दुरावस्था, नूतनीकरण न केल्यास मोर्चा काढणार, शिवसेना उबाठाचा इशारा

धुळे शहरातील पारोळा रस्ता अनेक दिवसांपासून दुरावस्थेत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे लहान मोठ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी दाखवले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनानंतरही रस्त्याची दुरावस्था कायम असून नागरिकांना खड्डे…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतनवाढीचा हप्ता — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

साक्री : राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या 18 संघटनांनी 13 ऑक्टोबरपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाचा तोडगा अखेर निघाला आहे. मुंबईत झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार आनंदराव अडसूळ आणि सर्व 18 संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर…

Read More

धुळे शहर अंधारात! एलईडी पथदिवे प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाने आयुक्तांविरोधात केले निदर्शने धुळे शहरातील एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) तर्फे करण्यात आला आहे. “गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधींचे टेंडर काढूनही शहरातील अनेक भाग अंधारात आहेत, मग आयुक्त मॅडम आणखी किती लुटणार?” असा तीव्र सवाल ठाकरे सेनेने उपस्थित केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

गिधाडे तापी पुलावर दुर्दैवी घटना : विरदेल तालुक्यातील तरुणाची नदीत उडी; शोधकार्य सुरू

शिंदखेडा तालुक्यातील गिधाडे तापी पुलावर आज 13 ऑक्टोबर रोजी एका तरुणाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण विरदेल गावचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले असून, नातेवाईक देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आणि आपत्कालीन पथकाकडून तरुणाचा शोध सुरू असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, पुलावर उभी असलेली गाडी…

Read More
Back To Top