आदिवासी विकास विभागातील प्रकल्पस्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा उत्साहात पार — १५४५ विद्यार्थी खेळाडू सहभागी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत प्रकल्पस्तरीय दोन दिवसीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा 5 आणि 6 डिसेंबर रोजी नांदवन (ता. साक्री) येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या. प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि सुकापुर या चारही गटांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण 1545 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या…

Read More

साक्रीत 79 वा होमगार्ड दिन धुमधडाक्यात साजरा!

साक्री शहरात 79 वा होमगार्ड दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांनी रूट मार्च काढत कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम साक्रीतील होमगार्ड कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाला डीवायएसपी संजय बांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच साक्री पोलीस स्टेशनचे पीआय दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद रौंदळ, तालुका होमगार्ड समादेशक मनोज…

Read More

साक्री : आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली; हजारो अनुयायांची उपस्थिती

साक्री शहरातील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी-कोटी नमन करत त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. या कार्यक्रमाला अनुयायांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पुतळ्याच्या पूजनाने झाली. यावेळी उपस्थित…

Read More

ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम — नववधूस “माहेरची साडी” भेट देत संस्कारांची नवी परंपरा

धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक ग्रामपंचायतीकडून समाजाच्या संस्कारांचे दर्शन घडवणारा एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. गावातील मुलगी लग्नानंतर सासरी जात असताना तिच्या हातात माहेरची आठवण म्हणून “माहेरची साडी” देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायतीतर्फे सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात गावातील नववधू—संदीप दौलत शेवाळे आणि कारभारी लकडू सूर्यवंशी यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब…

Read More

दोंडाईचा : घरफोडी प्रकरणातील चार आरोपी जेरबंद; पोलिसांनी ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दोंडाईचा शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याने अतिशय जलदगतीने तपास करून उलगडा केला आहे. २५ नोव्हेंबरच्या रात्री ते २६ नोव्हेंबरच्या सकाळी भगवती इंजिनिअरिंग बके शॉप या दुकानाचे शटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध साहित्य चोरी केले होते. या घटनेची नोंद दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये भाग-५ गुन्हा क्रमांक ३०७/२०२५, BNS 305 (अ)…

Read More

धुळेच्या दोन विद्यार्थिनींची ‘मिस टीन इंडिया’ ग्रँड फिनालेसाठी निवड; महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

धुळे : धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी आहे. धुळ्यातील दोन तरुणी — तनिष्का महेंद्र जैन (वय १६) आणि तन्वी यतीन खैरनार (वय १६) — यांची प्रतिष्ठित Forever Grand Finale Season 5 – Miss Teen India स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरावरील फिनालेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २१ डिसेंबर दरम्यान जयपुर येथील झी स्टुडिओमध्ये पार पडणार आहे….

Read More

निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ,दोन हवालदार निलंबित!

धुळे जिल्हा पोलिस दलात मोठी कारवाई झाली असून जवळपास २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली असून निलंबित हवालदारांची नावे महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे अशी आहेत. मुद्देमाल जमा करण्याबाबत वरिष्ठांनी…

Read More

चोरीच्या तयारीत असलेला संशयित हत्यारासह पोलीसांच्या ताब्यात

दोंडाईचा पोलिसांनी रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान एक संशयिताला पाठलाग करून ताब्यात घेतले. ३ डिसेंबर २०२५ रोजी पोसई नकुल कुमावत, अंमलदार नरेंद्र शिरसाठ, भटू पाटील आणि प्रवीण निकुंभे हे शहरात गस्त घालत असताना बसस्थानकाजवळ एका मोटारसायकलस्वाराने पोलिसांना पाहताच मोटारसायकल रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्याला पकडले. चौकशीअंती त्याने आपले नाव विष्णू किसन वळवी (रा….

Read More

5 डिसेंबर ला राज्यभरातील सर्व शाळा बंद

शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन. राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी पत्रका द्वारे सदर…

Read More

सासऱ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर करणारा जावई अटकेत; निजामपूर पोलिसांची धडक कारवाई

निजामपूर पोलिसांनी साक्री तालुक्यातील रोजगाव येथे झालेल्या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या जावयासह दोघांना अटक करून महत्त्वाची कारवाई केली आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सोमा सरगर यांनी आपल्या जावयाकडे मुलीच्या गर्भपाताबाबत विचारणा केली होती. याच रागातून जावई गोरख लखा कोळपे, त्याचा भाऊ आणि आई यांनी मिळून सोमा सरगर यांना बेदम मारहाण…

Read More
Back To Top