
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन
धुळे: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीने धुळ्यात तीव्र आंदोलन छेडले. उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. महिला सुरक्षेच्या बाबतीत सत्ताधारी महायुती सरकारचे अपयश स्पष्ट होत असल्याचे आंदोलकांनी ठणकावले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अमानुष घटनेनंतर अवघ्या सात दिवसांतच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या…