साक्रीतील आमोडे गावात महाशिवरात्री उत्साहात साजरी

मंगलमय वातावरणात गावातून निघाली शोभायात्रा, साक्री तालुक्यातील अध्यात्मिक असलेले आमोडे गाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे.  या गांवात महादेवाची शिवलिंग व आदिशक्ती दुर्गा मातेच व कंसरा मातेचे मंदिर स्थापना करण्यात आली आहे,  या वर्षी ही सालाबाद प्रमाणे आमोडे (आनंदपूर ) गांवात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी -श्री -श्री -श्री, 1008 महामडलेश्वर आदिशक्ती…

Read More

धुळ्यात अभाविप चे रस्ते दुरुस्ती संदर्भात उपायुक्तांना निवेदन

अभाविपच्या धुळे शाखेतर्फे SSVPS अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता तात्काळ बनवणे व जुना मुंबई – आग्रा रोड रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे या संदर्भात धुळे महानगर पालिकेच्या उपायुक्त स्वालिहा मालगावे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या कित्येक महिन्यांपासून SSVPS अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी येत आहेत. या रस्त्यात 2 महाविद्यालये व 1 शाळा…

Read More

साक्रीच्या बेहड जिल्हा परिषद शाळेची खराब अवस्था

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या बेहड जिल्हा परिषद शाळेची अवस्था खूप बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेची शाळा हि खूप जुनी असून शाळेची कौले पूर्णपणे तुटलेली असल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी शाळेत शिरते, त्याचप्रमाणे शाळेच्या भिंतींना तडे गेले आहे. यामुळे विद्यार्थी तथा शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच संदर्भात शासनाकडे वारंवार मागणी करूनही शाळेचे काम होत नसल्यामुळे…

Read More

आठ लाखांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता अटकेत

सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) नंदुरबार येथील उपअभियंता नितीन इंगळे (वय ५१) यांना ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मच्या नावाने सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील २८ गावांमध्ये स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम मंजूर झाले…

Read More

साक्री येथे माता रमाईंच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साक्री येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महिला भगिनींच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक दीपक वाघ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली….

Read More

साक्रीच्या तन्वी भदाणेची कलाक्षेत्रात दमदार कामगिरी

दादासाहेब फाळके पुरस्काराने तन्वी सन्मानित धुळे जिल्ह्यातील साक्री ची तन्वी निलेश भदाणे हि लहान वयातच कलाक्षेत्रात बहुआयामी कलागुणांच्या बळावर मोठी होत आहे. अवघ्या सहा वर्षांची तन्वी वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. तिच्या या कलागुणांमुळेच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिव्ही विश्वातही तिची छाप पडलेले दिसून येते. गुल्लू जासूस’ या क्राईम शोमध्ये तसेच ‘रसिली…

Read More

अवैध गांजा बाळगणाऱ्या हॉटेल चालकाला अटक

मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान टोल नाक्याजवळ मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल चालकाला अवैध गांजा बाळगण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, तो ५ ते ६ ग्रॅम वजनाच्या २१ प्लास्टिक पाऊचमध्ये भरलेला होता. जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत सुमारे २,३२० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ५…

Read More

साक्री विश्रामगृहात पांझरा कान बचाव समितीची बैठक संपन्न

साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याबाबत  ४ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे बैठक घेतली गेली.  या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ, तुळशीराम गावित,  कामगार नेते अशोक द भामरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भानुदसजी गांगुर्डे भाजपाचे वेडू सोनवणे शेतकरी संघटनेचे वेडु तात्या अकलाडे शेतकरी संघटनेचे निंबा परशुराम जाधव कासा-याचे प्राध्यापक युवराज काकुस्ते कारखान्याचे आवसायक साहेब प्रतिनिधी शिवाजी सोनवणे भाडण्याचे…

Read More

अवैध दारू वाहतुकीवर दोंडाईचा पोलिसांची धडक कारवाई

६.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक दोंडाईचा | दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक इमरान खान व त्यांच्या पथकाने मांडळ चौफुली परिसरात सापळा रचला. धुळे येथून दोंडाईचा मार्गे अवैध दारू वाहतूक करणारी बोलेरो…

Read More

वोल्वो लक्झरीच्या आड गुटखा तस्करी उघड८ लाखांच्या गुटख्यासह बस जप्त

वोल्वो लक्झरी बसचा वापर करून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी केली जात असल्याचा प्रकार धुळे तालुका पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख 18 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा तसेच सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची वोल्वो बस जप्त करण्यात आली आहे.पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई–आग्रा महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. इंदौरकडून मालेगावच्या…

Read More
Back To Top