महाराष्ट्र
शिंदखेड्यात युरिया खताची तीव्र टंचाई; ठाकरेसेना आक्रमक, प्रशासनाला ७२ तासांचा अल्टीमेटम
शिंदखेडा तालुक्यात सध्या युरिया खताच्या तीव्र टंचाईने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाल्याचे चित्र आज शिंदखेडा तहसील कार्यालयात पाहायला मिळाले. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेटवर ठिय्या देत आंदोलन करत तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली. शिवसेनेच्या वतीने यावेळी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. यात युरिया खत…
बनावट गावठाण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची अचानक बदली; ग्रामस्थांनी केली बदली रद्द करण्याची मागणी, रास्ता रोकोचा इशारा
धुळे तालुक्यातील मौजे महाललोंढा येथील लघु सिंचन तलावाच्या सुमारे ६ एकर जमिनीचे बनावट गावठाण प्रमाणपत्राद्वारे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याच्या प्रकरणात चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाला राजकीय दबावाचे स्वरूप असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्याची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी…
गुन्हेगारांचे सोशल मिडीयावर उदात्तीकरण करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे दाखल; धुळे पोलिसांची कारवाई
सोशल मीडियावर गुन्हेगारीचा गौरव करणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडीओंचा फैलाव रोखण्यासाठी धुळे पोलिसांनी कडक पावले उचलली असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगार मयत रफिउद्दीन शेख उर्फ गुड्या व विक्रम श्यामराव गोयर उर्फ विकी बाबा गोयर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ व पोस्ट्स काही इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल होत…
धुळ्यातील डीजे स्पर्धेवर पोलिसांची कारवाई; दोन डीजे वाहने जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी शितलामाता मंदिराजवळील रस्त्यावर दोन डीजे वाहनांकडून करण्यात येणाऱ्या कर्णकर्कश आवाजातील स्पर्धेमुळे नागरिक हैराण झाले होते. या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळताच, धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३:५५ वाजेच्या सुमारास डीजे वाहनांकडून मोठ्या आवाजात संगीत लावून स्पर्धा केली…
शिरपूरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त डीबीटी अडथळ्यावर उपाययोजना
लाभार्थ्यांच्या घरपोच भेटीद्वारे आधार पडताळणी मोहीम महसूल सप्ताहानिमित्त शिरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी (Direct Benefit Transfer) न झालेल्या लाभार्थ्यांसाठी घरभेट उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या छायांकित प्रती जमा करण्यात आल्या. शिरपूर तहसील हद्दीतील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १,४१७ लाभार्थी…
धुळे जिल्ह्यात ‘वीर परिवार सहायता योजना’ अंतर्गत विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन
सैनिक कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदतीसाठी नव्या उपक्रमाची सुरुवात धुळे : देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदत मिळावी, यासाठी ‘वीर परिवार सहायता योजना’ अंतर्गत धुळे जिल्हा सैनिक कार्यालयात ‘विधी सेवा चिकित्सालया’चे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे…
150 महाविद्यालयीन युवक, युवतींची महसूल दूत म्हणून नियुक्ती
महसूल विभागाच्या ‘महसूल सप्ताह 2025’ अंतर्गत धुळे तालुक्यात ‘महसूल दूत’ उपक्रम हाती घेण्यात आला. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला असून, 150 महाविद्यालयीन युवक-युवतींना महसूल दूत म्हणून नेमण्यात आले आहे. यांना ओळखपत्रे देऊन विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या माध्यमातून…
धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार बेंडया वाघमोडे MPDA अंतर्गत नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध
धुळे शहरातील समाजविघातक व धोकादायक गुन्हेगार वैभव ऊर्फ रोहित ऊर्फ बेंडया नारायण वाघमोडे (वय २२, रा. वाल्मीकी आंबेडकर वसाहत, दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर) याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करत नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण, उत्सव व निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी समाजात भीती निर्माण…
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर युवासेनेचा संताप, धुळ्यात तीव्र आंदोलन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ‘हिंदू दहशतवाद’ या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधानामुळे संपूर्ण सनातन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत धुळ्यात शिवसेनेच्या युवासेनेने जोरदार आंदोलन केलं. हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी युवासेना कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्याविरोधात घोषणा देत संताप…
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन; बोगस शालार्थ प्रकरणावरून निषेध
धुळे – नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चौकशी न करता थेट अटक केली जात असल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित…
