अवघ्या ७ मिनिटात रोखला जुनवणे येथील बालविवाह

धुळे तालुक्यातील जुनवणे येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले जात असल्याची माहिती मिळताच टीम तिथे जाऊन धडकली. अवघ्या ७ मिनिटात हा बाळ विवाह रोखण्यात पथकाला यश आले.या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 25 मे, 2025 रोजी चिंचगव्हाण, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे बालविवाह होणार आहे. बालिका व तीचे कुटुंब 24 मे, 2025 रोजी हळदीच्या…

Read More

झगमगाटामागील तपश्चर्येचे विस्मरण होऊ नये,माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन

शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान आयोजित सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळा “प्रतिभेचा अंश दैवी असू शकतो, पण तो अंश फुलवण्यासाठी आवश्यक परिश्रम, संघर्ष आपल्याला दिसत नाहीत. झगमगाटामागे तपश्चर्या असते, हे आपण विसरता कामा नये”, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी येथे केले. ‘यशामागील अशा तपश्चर्येचा सन्मान सुवर्णरत्न पुरस्काराच्या निमित्ताने होतो, हे कौतुकास्पद आहे’, असेही जावडेकर…

Read More

कामराज निकम यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा तीव्र निषेध

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस कामराज निकम तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेली सर्व फिर्याद पूर्णपणे खोटी, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, प्रशासनाने वस्तुनिष्ठ तपास करून कार्यवाही करावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणे बंद करून राजकीय हेतूने होणारा प्रशासनाचा…

Read More

धुळे जिल्ह्यात क्रीडा प्रशिक्षकांची पदे तात्काळ भरा – अॅड. पंकज गोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

धुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी रिक्त असलेल्या प्रशिक्षकांच्या जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना महाराष्ट्राचे सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते…

Read More

हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर

धुळे देवपूर प्रभाग क्र. 2 मधील ओमशिवम नगर, भगवती कॉलनी आणि पांडव नगर परिसरातील नागरिकांना मागील काही काळापासून हायवेवर साचलेल्या गढूळ पाण्यामुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हितेश अग्रवाल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. बीबीसी हॉटेलजवळील हायवेवरील मोरी ही पाण्याने पूर्णपणे भरून…

Read More

धुळ्याच्या नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पदभार स्वीकारला

धुळेच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज २७ मे रोजी स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आज दुपारी धुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी (धुळे) रोहन…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिलामेळावा संपन्न

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळे येथे भारतीय जनता पक्ष महिला आघाडी व कामगार आघाडीच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले, तर सामाजिक एकात्मता आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले…

Read More

मासे कुत्र्याने खाल्ले म्हणून संताप, मुलाकडून वृद्ध आईची लाकडी दांडक्याने हत्या

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील वाठोडे शिवारात घडली घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वाठोडे गावाच्या ताजपुरी शिवारामध्ये किरकोळ कारणावरून 67 वर्षीय आईची तिच्याच मुलाकडून लाकडी दांडक्याने अमानुष हत्या करण्यात आली. मृत महिलेचे नाव टिपाबाई रेबला पावरा असून त्या मूळच्या खैरकुटी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील रहिवासी होत्या….

Read More

बनावट बियाणे विक्री करणारी टोळी गजाआड; कृषि विभाग व निजामपूर पोलिसांची संयुक्त कारवाई

निजामपूर परिसरात बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर कृषी विभाग आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुप्त बातमीच्या आधारे आखाडे फाट्याजवळ करण्यात आली. बनावट बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने धाडसी निर्णय घेत शेतकरीहितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृषी विभागाचे बियाणे निरीक्षक अरुण तायडे आणि…

Read More

महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राच्या सल्लागार समिती सदस्यपदी डॉ. गोविंद पोद्दार व राहुल पोद्दार यांची,तर सचिवपदी डॉ.संजय ढोडरे यांची नियुक्ती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्राच्या स्थानिक सल्लागार समितीवर प्रा. डॉ. गोविंद पोद्दार आणि राहुल पोद्दार यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून, सचिवपदाची जबाबदारी कार्यकारी संचालक प्रा. डॉ. संजय ढोडरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे…

Read More
Back To Top