महाराष्ट्र
साक्री तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू पास वितरणास सुरुवात
महाराष्ट्र शासनाच्या वाळू धोरण २०२५ आणि महसूल व वन विभागाच्या २० एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार, साक्री तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घरपोच वाळू पास वाटप करण्याची महत्त्वपूर्ण योजना आज प्रत्यक्षात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या या निर्णयानुसार, घरकुल उभारणीसाठी पात्र लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू घरपोच मिळणार आहे….
धुळे शहरात धर्म परिवर्तनाचा प्रकार उघड — आ. अनुप अग्रवाल यांची तत्काळ कारवाई
धुळे शहरातील रासकरनगरमध्ये धर्म परिवर्तनाच्या संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना विशिष्ट धर्माचे धार्मिक ग्रंथ मोफत वाटप करून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. काल २१ मे रोजी सकाळी हिरे मेडिकल रुग्णालयात काही…
सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेला 5329 कोटींचा निधी मंजूर- मंत्री रावलांच्या प्रयत्नांना यश
धुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाच्या सुविधा मिळवून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेस नुकतेच एक ऐतिहासिक वळण मिळाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 20 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत या योजनेस ₹5329.46 कोटींच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मंजुरीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील आर्थिक अडथळे दूर होणार असून, शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला…
ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू
जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एमआयडीसी खादगाव ते आंबीलहोळ रस्त्यावर आज २० मे रोजी दुपारी दुर्दैवी अपघात घडला. ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक गुलाब जमा चव्हाण (वय ३५) यांचा ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला.ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्यात पडले. ट्रॅक्टर पूर्णपणे त्यांच्या अंगावर गेल्याने या अपघातात…
धुळ्यातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा; पोलीस श्वान ‘बुट्स’च्या मदतीने आरोपीचा पर्दाफाश!
धुळे शहरातील गांधी चौक परिसरातील भिसमिल्ला गलीत २ लाख रुपयांची घरफोडी झाल्यानंतर, तपास करताना धुळे पोलीस दलाच्या ‘बुट्स’ या श्वानाने दाखवलेल्या दिशा आणि हुशारीमुळे या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. या प्रकरणी रामलाल साठे या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.तपासात स्पष्ट झाले की, दिनांक २६ एप्रिल रोजी रात्री ते २७ एप्रिल सकाळी दरम्यान अज्ञात…
ग्रामपंचायत अधिकाऱ्याने काढला ४० हजारांची लाच घेत मोटारसायकलवरून पळ; धुळे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अटक
पारोळा, ता. २० मे – ठेकेदाराकडून १० टक्के लाच घेत मोटारसायकलवरून पळ काढणाऱ्या तामसवाडी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम करणारे ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार…
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर
मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कार, महेश म्हात्रे, अभिजित करांडे, अमेय तिरोडकर, दिनेश केळुसकर आदिंचाही होणार गौरव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी येथे केली.. यावेळी एस.एम.देशमुख यांनी परिषदेचे अन्य पुरस्कार देखील जाहीर केले…
धुळे जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन – असामाजिक घटकांवर पोलिसांची कडक कारवाई
धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी गणपती उत्सव व इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १३ मे रोजी व्यापक नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत असामाजिक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर ठोस कारवाई करत जनतेच्या सुरक्षेचा विश्वास अधिक बळकट केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 मे 2025 रोजी…
एमआयडीसीतील चोरीप्रकरणी दोन आरोपी गजाआड – सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जिल्ह्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीचा तपास करताना पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचा…
धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी गजेंद्र अंपळकर तर ग्रामीणची धुरा बापू खलाणेंकडे
भाजपच्या जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालीये कालावधी संपलेल्या आणि त्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या नव्हता अश्या सर्वच जागांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यात धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा गजेंद्र अंपळकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांची वर्णी लागली आहे.धुळे शहरात दीड वर्षांपूर्वी…
