धुळे महापालिकेची मोकाट कुत्र्यांवर मोहीम — लवकरच निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरणाला प्रारंभ

आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश, कोल्हापूरच्या ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ संस्थेची नियुक्ती धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे हैराण झालेल्या धुळेकरांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, धुळे महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम गुरुवार दि. ५ जुनपासून सुरू होत आहे. ही मोहीम कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या नोंदणीकृत संस्थेच्या…

Read More

शहरातील अव्यवस्थांवर आ.अनुप अग्रवाल आक्रमक – नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासमोर मांडले धुळ्याचे खरे चित्र

धुळे शहरातील वाढती अव्यवस्था, जनावरांची अवैध कत्तल, मांस विक्री, अतिक्रमणांचा विळखा आणि नशेच्या औषधांचा काळाबाजार यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची ३ जून रोजी औपचारिक भेट घेतली. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी शहराच्या वास्तव परिस्थितीचा सविस्तर आढावा सादर करत…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एनसीसी कॅडेट्ससाठी “योग व सार्वजनिक आरोग्य” यावर विशेष सत्र

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 48 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, धुळे आणि डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने “योग व सार्वजनिक आरोग्य” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात सुमारे 125 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमात योग विद्या धाम येथील सुप्रसिद्ध योगप्रशिक्षिका प्रा. मनीषा चौधरी मॅडम प्रमुख वक्त्या…

Read More

जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच, लाच घेताना पंटर रंगेहाथ ताब्यात

धुळे – भामटा राजपुत जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंटर वाल्मिक प्रतापसिंग झाल्टे (राजपुत) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई धुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार संजय शिंदे व इतर कर्मचाऱ्यांचाही उल्लेख असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदाराने आपल्या…

Read More

एममआरआय’ मशिनअभावी हजारो रुग्ण निदान व उपचारांपासून वंचित

आ.अनुप अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडली गंभीर स्थिती धुळे जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने हजारो रुग्ण योग्य निदान आणि उपचारांपासून वंचित राहत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय…

Read More

धुळे जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई; १३.५ लाखांचे अवैध बियाणे जप्त

धुळे – कृषी विभागाच्या वतीने आज पहाटे अनधिकृत बियाणेविक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. वेशभूषा परिधान करून गुप्तपणे केलेल्या या छाप्यांत धुळे तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली.या कारवाईत ९ गोण्यांमध्ये भरलेली सुमारे ९०० बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याची एकूण किंमत अंदाजे १३ लाख ५० हजार रुपये इतकी…

Read More

कामराज निकम यांना १४ दिवसांची जेलवारी

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नळ जोडणीच्या वादातून त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज ३० मे रोजी कामराज निकम यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.दुपारी ३…

Read More

अवघ्या ७ मिनिटात रोखला जुनवणे येथील बालविवाह

धुळे तालुक्यातील जुनवणे येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले जात असल्याची माहिती मिळताच टीम तिथे जाऊन धडकली. अवघ्या ७ मिनिटात हा बाळ विवाह रोखण्यात पथकाला यश आले.या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 25 मे, 2025 रोजी चिंचगव्हाण, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे बालविवाह होणार आहे. बालिका व तीचे कुटुंब 24 मे, 2025 रोजी हळदीच्या…

Read More

कामराज निकम यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा तीव्र निषेध

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस कामराज निकम तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेली सर्व फिर्याद पूर्णपणे खोटी, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, प्रशासनाने वस्तुनिष्ठ तपास करून कार्यवाही करावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणे बंद करून राजकीय हेतूने होणारा प्रशासनाचा…

Read More

धुळे जिल्ह्यात क्रीडा प्रशिक्षकांची पदे तात्काळ भरा – अॅड. पंकज गोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

धुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी रिक्त असलेल्या प्रशिक्षकांच्या जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना महाराष्ट्राचे सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते…

Read More
Back To Top