
अज्ञात व्यक्तीने लावली शेतातील खळ्यांना आग , धुळे तालुक्यातील नेर येथील घटना
धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने २३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जाणीवपूर्वक आग लावली. यात तिन्ही शेतकऱ्यांचे खळ्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली. यामुळे जीवित हानी टळली असली, तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे….