साक्रीमध्ये “आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळा यशस्वी पार पडली
साक्री : महाविद्यालयीन युवतींना आधुनिक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवण्यासाठी “आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळा साक्री येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शेवाळे यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्याचे महत्त्व सांगितले आणि महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन…
