
नोकरी टिकवायची असेल तर पैसे द्या, शिपायाकडून मुख्याध्यापकाने घेतली लाच..
आपला भाऊ चेअरमन असल्याचे धमकावून शिपायांकडून पैशांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हि घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कुल येथे घडली. धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.आपल्या भावाची संस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर, शाळेतील प्रत्येक शिपायाला…