साक्री तालुक्यात युरिया खताची टंचाई; दोन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
शेतकऱ्यांच्या तत्परतेने जीव वाचला साक्री तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संतापाच्या टोकावर पोहोचले आहेत. याच संतापातून दहिवेल बाजारपेठेत दोन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित शेतकऱ्यांच्या जागरुकतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.मिळालेल्या माहितीनुसार, बोधगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (५४) व डोंगरु बहिरम (३३) हे दिवसभर खतासाठी फिरूनदेखील युरियाची एकही बॅग मिळवू शकले…
