सायबर पोलिसांची तत्पर कारवाई; पॅथॉलॉजी लॅब डॉक्टरांचे 83 हजार परत

धुळे – सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून पॅथॉलॉजी लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील 83 हजार रुपये सायबर पोलिसांनी काही तासांत परत मिळवून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी निदान पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. प्रशांत देवरे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून, “मी सैन्यातील अधिकारी आहे, आमच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामूहिक वैद्यकीय तपासणी करायची आहे” असे…

Read More

धुळ्यात वंचित बहुजन आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

शिरपूर तालुक्यातील विविध विकासकामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित तक्रारींवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज धुळ्यात धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आघाडीने अनेक मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये घरकुल योजनेत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरे न मिळाल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली. “घरकुल मंजूर असूनही ते…

Read More

सोनगीर पोलीसांचा गावठी दारूविरोधात धडक कारवाई; २.३१ लाखांचा मुद्देमाल नष्ट

धुळे – आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. कापडणे, धनुर, लामकाणी, सोनगिर आणि सायने परिसरातील ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान गावठी हातभट्टी बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन, साधनसामग्री तसेच तयार दारू मिळून एकूण ३३३० लिटर वॉश…

Read More

साक्रीतील छडवेल पखरूण सरपंचपदी आक्काबाई गोयकर यांची बिनविरोध निवड

साक्री तालुक्यातील छडवेल (पखरूण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आक्काबाई सोमा गोयकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच मंदाकिनी नांद्रे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. गावकरी पॅनलने दिलेल्या आश्वासनानुसार प्रथमच ठेलारी धनगर समाजातील व्यक्तीला सरपंचपदाचा मान मिळाला आहे. सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत अक्काबाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक…

Read More

साक्रीत अँड. पूनम काकूस्ते यांची भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड

साक्री तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अँड. पूनम काकूस्ते (शिंदे) यांची भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, धुळे जिल्हा पालक मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार…

Read More

जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा; एमआयएमला मोठा धक्का

धुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून माजी आमदार आरक्षण यांनी एमआयएम पक्ष सोडल्यानंतर आता धुळे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दिपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राजीनामा पत्रात, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक…

Read More

धुळ्यात १४ ऑगस्टला होणार १ हजार एकशेएकरा फूट तिरंग्याची भव्य पदयात्रा

धुळे शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त गुरुवारी (१४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता १ हजार एकशेएकरा (११११) फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे. ही पदयात्रा मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज चौक येथून सुरुवात होईल….

Read More

अवधान औद्योगिक वसाहतीत फायर स्टेशन पूर्ण, मात्र साधनसामग्रीची प्रतीक्षा

धुळे येथील अवधान औद्योगिक वसाहतीत नुकतेच बांधून पूर्ण झालेले अद्ययावत अग्निशामक केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक दोन अग्निशामक बंब आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अवधान औद्योगिक वसाहतीत आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून एक अद्ययावत फायर स्टेशन उभारण्यात आले आहे. येथे ऑइल, केमिकल आणि…

Read More

कापडणेकरांना शुद्ध पाणी मिळावे; 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणास परवानगी द्यावी

– ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धुळे (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पाण्याच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या कापडणे गावकऱ्यांनी आता आंदोलनाची दिशा बदलत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे परवानगी देण्याची औपचारिक मागणी आज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे यांनी ग्रामपंचायतीला…

Read More

धुळ्यात तिसऱ्या भाषेची सक्ती व जाधव समिती विरोधात पत्रकार परिषद

इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती तसेच डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या घोषणेचा तीव्र निषेध व्यक्त करत, समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीकडून करण्यात आली. धुळे साक्री रोड येथील पत्रकार भवनात आज आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार आणि भाषा अभ्यासक तसेच भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब…

Read More
Back To Top