
धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मन देशात काम करण्याची सुवर्ण संधी;
इच्छुक युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन धुळे – जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळास जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यात रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत जर्मन राज्यास कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत महाराष्ट्र शासन व बाडेन वुटेनबर्ग राज्य जर्मनी यांचे दरम्यान सामंजस्य करार झालेला आहे. या करारामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे….