धुळ्यातील कष्टभजन मित्र मंडळाने वृंदावन येथून माती आणून साकारली गणेशाची आकर्षक मूर्ती

ण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंडळाने वृंदावन येथून आणलेल्या मातीतून गणेशाची आकर्षक मूर्ती साकारली असून त्यात गाईला देण्यात येणाऱ्या चाऱ्याचाही वापर करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून या मंडळात एकदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्तीचाच संकल्प कायम ठेवला जातो. याविषयी बोलताना मंडळाचे अध्यक्ष गिरीश…

Read More

साक्रीत ‘गाव तेथे समन्विका’ अभियानाची सुरुवात; अँड. पूनम शिंदे-काकुस्ते यांची अभिनव संकल्पना

भारतीय जनता पक्ष महिला आघाडी साक्री तालुक्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे समन्विका’ या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात करीत आहे. या अभियानाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती महिला समन्विकांच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक-युवती, महिला आणि विद्यार्थिनींपर्यंत थेट घराघरात पोहोचवली जाणार आहे. या अभियानाची संकल्पना भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष अँड. पूनम शिंदे-काकुस्ते यांची असून, त्याबाबत…

Read More

लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

साक्री: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकारी मन्सीराम कळशीराम चौरे (रा. पिंपळनेर) आणि कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख (रा. साक्री) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या शेतजमिनीवर योजनांचे पैसे जमा करून देण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला १० हजारांची लाच मागितली होती,…

Read More

थकीत वेतन व पीएफ न दिल्यास उद्यापासून कामबंद आंदोलन

धुळे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा धुळे (प्रतिनिधी) : धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगार, एक वर्षाचा पीएफ आणि बोनस थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका व संबंधित ठेकेदार याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन त्वरित द्यावे, अन्यथा उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. धुळे महानगरपालिकेच्या…

Read More

धुळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; १९ ऑगस्टपासून संप सुरूच

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर थाळीनाद आंदोलन केले. १९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या बेमुदत कामबंद आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, शासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या लहान मुलांसह थाळ्या वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा…

Read More

धुळे जिल्हा डीजे चालक-मालक संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे परवानगीची मागणी

धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाने डीजे व साऊंड सिस्टमवर घातलेली बंदी शिथिल करण्याची मागणी धुळे जिल्हा डीजे चालक-मालक संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले. संघटनेने म्हटले आहे की, “डीजे व्यवसायावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अनेकांनी या व्यवसायासाठी बँक व खाजगी कर्ज घेतलेले आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर टोळीचा पर्दाफाश

धुळे: लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिर्यादी तुषार रमेश खैरनार (वय 35, व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. घटना अशी घडली:तुषार यांच्या लग्नाचे वय निघून जात असल्याने त्यांची आई स्थळ शोधत होती. दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी लग्न लावणाऱ्या…

Read More

धुळ्यात जलगंगा मित्र मंडळाकडून पावनखिंडच्या लढाईचा देखावा

धुळे │ शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध मंडळांच्या वतीने सादर होणाऱ्या सजीव देखाव्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील जलगंगा मित्र मंडळाने यंदा ऐतिहासिक पावनखिंडच्या लढाईवर आधारित देखावा सादर केला आहे. या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी रायाजी बांदल व त्यांच्या 300 बांदल सेनेसोबत कशाप्रकारे जीवाची…

Read More

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको; समता परिषदेचे भर पावसात आंदोलन

धुळे : धुळे शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली. उमेश महाजन यांनी सांगितले की, “आधीच ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती 17 टक्क्यांच्या आरक्षणात समाविष्ट आहेत. त्यात मराठा समाजाला समाविष्ट करण्याची…

Read More

धुळेकरांनो सावधान! पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

धुळे : भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने धुळे जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. १ ते ५ सप्टेंबरदरम्यान दररोज मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून ही शक्यता “अतिशय…

Read More
Back To Top