धुळे पोलिस दळणवळण विभागाला राज्यात दुसरा क्रमांक; तांत्रिक कार्यक्षमतेची दखल
धुळे : पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात धुळे विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत पश्चिम विभाग, पुणेमधील २८ युनिट्सपैकी दुसरा क्रमांक मिळवला आहे. हे मूल्यांकन अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागातील तांत्रिक कार्यक्षमता, नविन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि प्रशासकीय सुसूत्रता या…
