‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञे’ द्वारे जनजागृती करावी

सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे मीना भोसले यांचे आवाहन धुळे : ‘अक्षयतृतीये’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण, भटजी, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत. या घटकांनी ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन शहरातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीना भोसले यांनी सोमवारी 28 एप्रिलला साक्री रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

साक्री तालुक्यात तीन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

साक्री : दातरती, वाजदरे आणि बळसाणे शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी कारवाई केली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी धुळे यांच्या निर्देशानुसार तालुक्यात अवैध गुणखनिज वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे नेतृत्व साखरी तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी करत आहेत. शनिवारी…

Read More

अशोक नगर जलकुंभाच्या उभारणीला विलंब: शिवसेनेची आयुक्तांकडे लक्ष घालण्याची मागणी

प्रभाग क्रमांक १५ मधील अशोक नगर जलकुंभाच्या उभारणीचे काम तब्बल सात ते आठ महिन्यांपासून रखडले आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जलकुंभाचे काम थांबले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सौ. अमिता दगडे-पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या…

Read More

धुळे जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी १६ कोटींच्या नवीन कामांना मंजुरी

धुळे जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात विविध नवीन सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी १६ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. याबरोबरच अपर तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही नवे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही बैठक जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

रावेर एमआयडीसी साठी जागा मिळावी -पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप अग्रवाल यांची मागणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक धुळे जिल्हातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून आता जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी एमआयडीसीचा विकास करणे आवश्यक आहे. नरडाणा एमआयडीसी बरोबरच रावेर एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.रावेर एमआयडीसी च्या विकासासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…

Read More

पिंपळनेर खून प्रकरण: आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या आंबापाडा गावात ३० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या खून प्रकरणात आरोपी गुलाब बंडू बागुल यास धुळे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात मयत सुमनबाई बंडू बागुल यांच्या मुलाने, म्हणजेच आरोपी गुलाब बागुल याने दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र तिने पैसे नाकारल्याने रागाच्या भरात त्याने हाता-बुक्क्यांनी…

Read More

धुळ्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला जम्मू-काश्मीरमधील हत्याकांडाचा तीव्र निषेध

धुळे: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील निर्दोष नागरिकांवर केलेल्या हत्याकांडाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने तीव्र शब्दांत निंदा केली आहे. धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या करणे अत्यंत दुःखद आणि घृणास्पद कृत्य आहे, असे अभाविपने म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. अभाविपने या दहशतवादी कृत्याचा आणि कट्टरपंथी हिंसाचाराचा…

Read More

धुळे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक व बोगस माध्यमिक शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करा

शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी धुळे – बोगस शिक्षक भरती व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना हाताशी धरून, संस्था चालकांनी घातलेला हैदोस, संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना माझे जाहीर आवाहन आहे. अशा नकली चौकशांचे नाटक बंद करा ! दोषी व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, माजी आमदार…

Read More

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत ८०० नागरिक घेणार रामल्लाचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानकावर होणार शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांची अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने तीर्थयात्रा 26 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ धुळे रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल…

Read More

पहलगाम दुर्घटना: धुळे जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, धुळे जिल्ह्यातील कोणताही पर्यटक बाधित नसल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या यादीच्या आधारे ही माहिती निश्चित करण्यात आली आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ पावले उचलत मंत्रालयात राज्य नियंत्रण कक्ष तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र जिल्हा नियंत्रण…

Read More
Back To Top