सामूहिक बलात्कारप्रकरणी पाचही आरोपींना जन्मठेप

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल धुळे : जिल्हा सत्र न्यायालयाने दि.26/6/2025 रोजी एका ऐतिहासिक निकालात साक्री तालुक्यातील बोनगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्वच पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.निलेश कलाल यांनी बाजू मांडली व त्यांना फिर्यादीच्या बाजूने अँड राहुल वाघ यांनी मदत केली.3 जून 2023 रोजी मध्यरात्री…

Read More

तापी नदीत ट्रक कोसळण्याची दुर्घटना सुदैवाने टळली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार उघड

शिंदखेड्यातील तापी नदीच्या पुलावरून एक ट्रक कोसळता कोसळता,,, थोडक्यात बचावल्याची धक्कादायक घटना आज दि २५ जून रोजी घडली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुकवद गावाजवळील हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला, तरी विभागाकडून कुठल्याही प्रकारची स्पष्ट सूचना अथवा चेतावणीचे फलक लावण्यात आले नव्हते. परिणामी,…

Read More

आमदार अनुपभय्यांमुळेच २० हजार रहिवाशांना हक्काचा `सात-बारा’

अमोल मासुळे : मिल परिसरातील नागरिकांतर्फे आमदारांचा नागरी सत्कार धुळे शहरातील मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी मोठ्या पाठबळाची गरज होती. ते पाठबळ शहराचे आमदार अनुपभय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच आज मिल परिसरातील २० हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळणार आहे, असे…

Read More

देशसेवेकरिता प्रशिक्षणातून घडवा सर्वोत्तम छात्रसैनिक – ब्रिगेडियर ए. जी. बरबरे

४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मार्गदर्शन धुळे (ता. २४ जून): छात्रसैनिकांच्या प्रशिक्षणाद्वारे देशसेवेची मूल्ये बिंबवून त्यांना सर्वोत्तम नेतृत्वासाठी घडवले पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीनगर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए. जी. बरबरे यांनी धुळ्यात केले. ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या भेटीवेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ब्रिगेडियर बरबरे म्हणाले, “देशाच्या जडणघडणीत…

Read More

धुळ्यात होणार ११व्या शतकातील मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व सत्संग सोहळा

२५ जून रोजी धुळेकरांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. ‘वैदिक धर्म संस्थान’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग, धुळे’ यांच्या संयुक्त विद्यमाने मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व सत्संग सोहळ्याचे आयोजन दि. २५ जून रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत महाराजा अग्रसेन हॉल, धुळे येथे करण्यात आले आहे. या प्रसंगी दर्शनासाठी ठेवले जाणारे शिवलिंग एक ऐतिहासिक…

Read More

खा. डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते भाईजी नगर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात

धुळे शहरातील प्रभाग १८ मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर चालना मिळाली आहे. भाईजी नगर परिसरात तब्बल ५० लाख रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दि. २४ जून रोजी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते झाला. या भागात पावसाळ्यात पाणी साचण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे…

Read More

धुळ्यात हिंदी सक्तीविरोधात ठाकरे सेनेचे जोरदार आंदोलन

धुळे शहरात आज दि. २४ जून रोजी शिवसेना उबाठाच्या ठाकरे सेनेने राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करत जोरदार आंदोलन केले. ठाकरे सेनेने हातात साप्ताहिक मार्मिकच्या प्रती धरून हिंदी सक्तीचा निषेध केला. हिंदी सक्ती विरोधात जोरदार घोषणा देत सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात अनेक कार्यकर्ते आणि अनेक…

Read More

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणावरून मातंग समाज आक्रमक

लातूरच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी धुळे : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील जिल्हा भूमीलेखा कार्यालयात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याच्या घटनेने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, धुळे जिल्ह्यातही सकल मातंग समाज आक्रमक झालेला दिसून आला. या घटनेच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मातंग समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे…

Read More

शाळा परिसरात साचलेल्या पाण्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा त्रास

बाफना हायस्कूलच्या तक्रारीची ऍड. पंकज गोरे यांनी घेतली दखल धुळे :बाफना हायस्कूल परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना राज्य सहसचिव ऍड. पंकज गोरे यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची तात्काळ दखल घेत ऍड. गोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत…

Read More

हिरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६.६१ कोटींचा निधी मंजूर

धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटी ६१ लाख ५ हजार ५७० रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मागणीनुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाविद्यालयाच्या इमारती क्रमांक १ आणि २ मधील १४ लिफ्ट बंद पडल्या होत्या….

Read More
Back To Top