जयहिंद हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रेरणादायी उपक्रम जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून कार्यक्रमाला विशेष उर्जा लाभली. योगादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध योगासने, ध्यानधारणा, यम-नियम यांची माहिती देण्यात आली. योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे…

Read More

‘एमजेपीजेएवाय’ योजनेत धुळे जिल्हा बनावा राज्यात आघाडीचा – आ.अनुप अग्रवाल यांचे आरोग्यसेवकांना आवाहन

धुळे (ता. २० जून २०२५): महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (एमजेपीजेएवाय) अधिकाधिक लाभ गोरगरीब आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी धुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवकांनी जबाबदारीने काम करावे. या योजनेतून धुळे जिल्हा राज्यातील सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा बनावा, यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. शहरातील विविध खासगी रुग्णालयांत कार्यरत असलेल्या आरोग्यसेवकांची बैठक…

Read More

धुळे – नरडाणा – बाभळे एमआयडीसी उद्योजकांसाठी विशेष आढावा बैठक २२ जून रोजी

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे आवाहन – उद्योजकांनी आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे धुळे (दि. १९ जून २०२५) – धुळे, नरडाणा व बाभळे येथील एमआयडीसी क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून…

Read More

धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

३९ कोटी ४६ लाखांचा आरोग्य प्रकल्प | ट्रॉमा केअरसह सर्व सुविधा उपलब्ध होणार धरणगाव (दि. २० जून) : धरणगाव तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. यावेळी रुग्णालयाची मुख्य इमारत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या…

Read More

भाटपुरा येथे अनुभव शिक्षा केंद्राचा प्रेरणादायी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला

भाटपुरा (ता. शिरपूर, जि. धुळे) – अनुभव शिक्षा केंद्र, धुळे यांच्या वतीने भाटपुरा गावात आयोजित करण्यात आलेला प्रेरणादायी ओरिएंटेशन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात भाटपुरा तसेच परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या उत्स्फूर्ततेची झलक दाखवली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभव शिक्षा केंद्राच्या कार्याची, उद्दिष्टांची आणि युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर…

Read More

आ. अनुप अग्रवाल यांनी लावला कामांचा धडाका,विकासाचे रचताय मनोरे

अक्कलपाडा प्रकल्पातुन धुळे शहरासाठी 50 वर्षांकरिता जल आरक्षण मुंबईतील बैठकीत पांझरा रिव्हर फ्रंटसह विविध मागण्यांवर कार्यवाहीची ग्वाही धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी निवडून आल्यापासून विकासाचा धडाकाच लावला आहे. वेगवेगळ्या कामना मंजुरी मिळवत विकासाचे मनोरे रचतानाच धुळेकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात 100 टक्के जलसाठा…

Read More

धुळे शहरातील विकासकामांना दिलासा; मुंबईत आढावा बैठकीत १६ प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय

धुळे l प्रतिनिधी l मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत धुळे शहरातील १६ प्रमुख विकासप्रस्तावांवर सखोल चर्चा होऊन त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार अनुप अग्रवाल यांनी थेट शहराच्या विकासासंदर्भातील मुद्दे मांडले. या वेळी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह विविध विभागांचे…

Read More

न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपयुक्त उपक्रमाचे आयोजन; मान्यवरांचे मार्गदर्शन धुळे | प्रतिनिधीधुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. कार्यक्रम प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. महेशजी घुगरी, श्री. प्रविण बाफना, इंजि. चेतन…

Read More

करजकुपा गावात वारंवार वीज बिघाडांनी शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजनेची जोरदार मागणी

नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावातील शेतकरी व ग्रामस्थ गेले काही महिने खंडित वीजपुरवठा, भारनियमन आणि वारंवार बिघाडांमुळे त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होतो असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावातील वीजपुरवठा सध्या सुंदरदे येथून होत आहे, कारण अवकाळी पावसामुळे काही दिवसांपूर्वी…

Read More

गणेश मिसाळ यांची अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती; पश्चिम उपनगर वांद्रे येथे नवी जबाबदारी !

धुळ्यात प्रांताधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून सांभाळली जबाबदारी राज्य शासनाच्या आदेशानुसार श्री. गणेश मिसाळ यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून, त्यांची नियुक्ती पश्चिम उपनगरे, वांद्रे (अतिक्रमण निष्कासन) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी दिनांक १० जून २०२५ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. याआधी त्यांनी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई येथे सह व्यवस्थापकीय…

Read More
Back To Top