धुळे जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई; १३.५ लाखांचे अवैध बियाणे जप्त
धुळे – कृषी विभागाच्या वतीने आज पहाटे अनधिकृत बियाणेविक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. वेशभूषा परिधान करून गुप्तपणे केलेल्या या छाप्यांत धुळे तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली.या कारवाईत ९ गोण्यांमध्ये भरलेली सुमारे ९०० बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याची एकूण किंमत अंदाजे १३ लाख ५० हजार रुपये इतकी…
