बनावट बियाणे विक्री करणारी टोळी गजाआड; कृषि विभाग व निजामपूर पोलिसांची संयुक्त कारवाई
निजामपूर परिसरात बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर कृषी विभाग आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गुप्त बातमीच्या आधारे आखाडे फाट्याजवळ करण्यात आली. बनावट बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने धाडसी निर्णय घेत शेतकरीहितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृषी विभागाचे बियाणे निरीक्षक अरुण तायडे आणि…
