अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर

मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कार, महेश म्हात्रे, अभिजित करांडे, अमेय तिरोडकर, दिनेश केळुसकर आदिंचाही होणार गौरव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी येथे केली.. यावेळी एस.एम.देशमुख यांनी परिषदेचे अन्य पुरस्कार देखील जाहीर केले…

Read More

ज्या आईने दत्तक घेऊन वाढवलं, मुलीने संपत्तीसाठी तिलाच संपवलं

ज्या आईने तिला दत्तक घेऊन वाढवलं… प्रेम दिलं, शिक्षण दिलं, आयुष्य घडवलं… त्याच आईचा जीव घेण्याचा निर्णय तिने घेतला. ओडिशामधील एका धक्कादायक घटनेत, एका अल्पवयीन मुलीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्या पालक आई राजलक्ष्मी कर यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओडिशामधील परलाखेमुंडी शहरातली हि धक्कादायक घटना आहे, एका अल्पवयीन मुलीने आपल्या दोन…

Read More

शिक्षकाने मारली थप्पड, चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

प्रयागराज शहरातील नैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खाजगी शाळेत नर्सरी वर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृत मुलाच्या नातेवाइकांनी शाळेतील दोन शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृत मुलाचे नाव शिवाय असून तो डीडीएस ज्युनियर हायस्कूलमध्ये नर्सरीचा विद्यार्थी होता. त्याचे…

Read More

धुळे जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन – असामाजिक घटकांवर पोलिसांची कडक कारवाई

धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी गणपती उत्सव व इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १३ मे रोजी व्यापक नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत असामाजिक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर ठोस कारवाई करत जनतेच्या सुरक्षेचा विश्वास अधिक बळकट केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 मे 2025 रोजी…

Read More

एमआयडीसीतील चोरीप्रकरणी दोन आरोपी गजाआड – सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीचा तपास करताना पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचा…

Read More

पद्म पुरस्कारांकरीता नावे सूचविण्यासाठी- मंत्री रावलांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे नामवंत व्यक्तींच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना झाली असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे….

Read More

धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी गजेंद्र अंपळकर तर ग्रामीणची धुरा बापू खलाणेंकडे

भाजपच्या जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालीये कालावधी संपलेल्या आणि त्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या नव्हता अश्या सर्वच जागांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यात धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा गजेंद्र अंपळकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांची वर्णी लागली आहे.धुळे शहरात दीड वर्षांपूर्वी…

Read More

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरंभ फाउंडेशनकडून परिचारिकांचा सत्कार

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरंभ फाउंडेशनच्या वतीने धुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. रुग्णांसाठी त्यांनी दिलेल्या निःस्वार्थ सेवेची दखल घेत, जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिचारिका रुग्णाच्या उपचाराच्या संपूर्ण काळात त्यांची काळजी घेतात. त्या आपल्या घरातील माणसांसारखी सेवा देतात. यावेळी वक्त्यांनी सांगितले की, जसे सैनिक देशाचे रक्षण करतात, तसेच परिचारिका…

Read More

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार…

असा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोपाळ येथे दिली.सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची…

Read More

मुख्यमंत्री सहायता कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज 12 मे रोजी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला…

Read More
Back To Top