महाराष्ट्र
मोटारसायकल चोर गजाआड; ५ चोरट्या दुचाकींसह १.५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती
दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एक चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक २७ जून २०२५ रोजी रात्री ९ ते २८ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी…
अखेर गुलमोहर प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होणार
कलम ३०८ खाली गुन्हे दाखल करा, मुख्य न्याय दंडाधिकारी धुळे यांच्या न्यायालयाचे पुन्हा आदेश ! शिवसेना नेते, माजी आमदार,अनिल गोटे यांनी सरकारच्या व पोलीसांच्या नाकर्तेपणाला लावली चपराक धुळे – गुलमोहर १ कोटी, ८४ लाख, ८४ हजार, २०० रुपये, दिनांक २१ व २२ मे २०२५ च्या रात्री शासकीय विश्रामगृह ‘गुलमोहर’ कक्ष क्रमांक १०२ मध्ये, एवढी प्रचंड…
गुरुपौर्णिमेच्या दिवशी धुळे न्यायालय आणि पोलिसांची विशेष कारवाई; 42 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर धुळे जिल्हा न्यायालय व पोलिस प्रशासनाच्या वतीने ‘मुद्देमाल वितरण सोहळा-2025’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला एकूण 42 लाख 2 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालक आणि फिर्यादींना परत करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदया सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्रीमती माधुरी आनंद यांच्या हस्ते मुद्देमालाचे…
आरोपीला सिगारेट पाजणे पडले महागात, तीन पोलीस कर्मचारी निलंबित
धुळे शहरातील चाळीसगांवरोड पोलीस ठाण्यातील आरोपी अकबर जलेला उर्फ अकबर अली कैसर अली शाह यास आरोपीला बेल सुनावणी साठी न्यायालयात आणण्यात आले असता त्याला सिगरेट पीऊ दिली, असा फोटो वायरल झाला. यामुळे पोलिस प्रशासनाने तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. राहुल जगताप, वसीम शेख इक्बाल,महेंद्र जाधव असे या निलंबित…
धर्मांतर रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदे करणार
येत्या सहा महिन्यांमध्ये अनधिकृत चर्चही हटविणार आ. अनुप अग्रवाल यांच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांमध्ये आदिवासी समाजबांधवांसह अन्य समाजांतील नागरिकांच्या होत असलेल्या धर्मांतराबाबत कठोर कायदे करण्यात येतील. तसेच त्यातून अवैधपणे उभारल्या गेलेल्या चर्चसारख्या प्रार्थनास्थळांबाबत येत्या सहा महिन्यांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून अशा सर्व अनधिकृत प्रार्थनास्थळांचे बांधकाम हटविण्यात येईल,…
धुळ्यात चाकूच्या धाकावर दिड कोटी लुटले,आठ जणांवर गुन्हा दाखल
धुळ्यानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलाचा धाक दाखवत आठ दरोडेखोरांनी तब्बल दिड कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे तालुका पोलिसात आठ दरोडेखोरांविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरूवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम चार कोटी असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम दिड कोटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.मात्र दिवसेंदिवस…
सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवून मोठ्या गुंतवणुकीने उभारलेले सौर ऊर्जा प्रकल्प संकटात
विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा व्यापारी संघाने व्यक्त केला निषेध महावितरणच्या २५ जून २०२५ च्या पुनरावलोकन आदेशाद्वारे लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँग्रीकल्चर, लघु उद्योग भारती, धुळे व्यापारी महासंघ,डामा ( धुळे अवधान मेनु असोसिएशन), स्पुन मॅनु असोसिएशन आदी संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केला आहे.या…
धुळ्याच्या बारा पत्थर चौकात बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवर फिरले रोड रोलर!
धुळे शहरात बुलेटच्या कर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत, धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. बारा पत्तर चौकात झालेल्या या कारवाईत ५६ सायलेन्सर, २० हून अधिक प्रेशर हॉर्न आणि…
बंदुकीच्या जोरावर दोघांना ४ कोटींची रोकड लुटली
धुळे तालुक्यात परमेपाडा शिवारातील घटना उत्तरप्रदेशातून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल लुटण्यात आले आहे. लुटारूंनी बंदुकीच्या जोरावर दोघांना धमकावत त्यांच्याकडे असलेली ४ कोटींची रोकड पळवून नेली. या घटनेने मोठी खळबळ माजली आहे. घटनेचे वृत्त कळताच एलसीबीसह तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. तसेच युद्ध पातळीवर लुटारूंचा शोध जारी झाला असून पोलिसांचे पथक लुटारूंच्या…
छ. संभाजी महाराज स्मारकास अडथळा ठरणारे सुशोभीकरण त्वरित थांबवावे – स्मारक समितीची धुळे मनपाकडे मागणी
धुळे शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३० फूट उंचीच्या पहिल्या भव्य स्मारकास अडथळा निर्माण करणाऱ्या वीर सावरकर पुतळ्याजवळील सुशोभीकरणाच्या कामावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी स्मारक समितीने धुळे महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. ह्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, धुळे शहर व खानदेशातील शिवभक्तांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे शहरात…
