वाढीव घरपट्टीविरोधात ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन; महापालिकेसमोर बिले जाळून निषेध
धुळे : धुळे महापालिकेने नागरिकांना पाठवलेली वाढीव घरपट्टीची बिले हे शहरवासीयांच्या खिशाला कात्री लावणारे असून, याच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी घरपट्टीची बिले जाळत महापालिकेच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, “शहरात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा मिळत नसताना, महापालिकेने तीन…
