
तापीत जीव द्यायला निघाला, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वेळीच आणि संवेदनशीलतेने केलेल्या कृतीमुळे एका तरुणाचा जीव वाचल्याची घटना काल १० जून रोजी रात्री घडली. घरात झालेल्या छोट्याशा वादामुळे आत्महत्येच्या विचाराने घराबाहेर पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वेळेवर शोधून काढले आणि त्याचा जीव वाचवला. आमीन पिंजारी नावाच्या तरुणाचा वडिलांसोबत किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात तो घर सोडून निघाला आणि “आता मी…