धुळे जिल्ह्यात प्रशासनाची तत्परता; भाटपुरा येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. बालविवाहासंदर्भात माहिती 5 मे रोजी चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झाली. त्यानंतर धुळे येथील चाईल्ड हेल्पलाईनचे…

Read More

आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाचा ऐतिहासिक बारावी निकाल – 18 पैकी 18 शाखांचा 100% यश

शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाने यंदा बारावी परीक्षेच्या निकालात सर्व 18 शाखांचा 100% निकाल लागवून नवा शैक्षणिक आयाम गाठला आहे. एकूण 1856 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 1852 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संकुलाचा एकत्रित निकाल 99.78% इतका लागला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये 6 जणांनी 90% पेक्षा अधिक आणि 116 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण मिळवले…

Read More

धुळेच्या नॉर्थ पॉईंट स्कूलचा दहावीमध्ये शंभर टक्के निकाल; शुभ उपाध्ये प्रथम

श्री शिविप्र संस्थेच्या नॉर्थ पॉईंट इंग्लिश मिडियम स्कूलचा आयसीएसई बोर्डाअंतर्गत इयत्ता दहावीचा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर झाला असून, शाळेने १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं आहे. शाळेतील शुभ मनिष उपाध्ये याने ९८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, संपूर्ण जिल्ह्यात गौरवाचे…

Read More

आमदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप

राजस्थानमधील बागीदौरा येथील भारत आदिवासी पक्षाचे आमदार जयकृष्ण पटेल यांना २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. खाणकाम विषयक प्रश्न विधानसभेतून हटवण्यासाठी त्यांनी एका कंपनीकडून तब्बल १० कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे. राजस्थान भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात कारवाई करत आमदाराला अटक केली आहे. कंपनीकडून तडजोडीतून सुरू झाला लाचखोरीचा खेळजयकृष्ण पटेल…

Read More

माजी आ.प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश

धुळे तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार तथा नंदुरबारजिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ना.अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत आज ३ मे रोजी हा प्रवेश सोहळा झाला. प्रा. शरद पाटील यांनी दुसऱ्यांदा शिवसेना सोडली.धुळे तालुक्यातील कुसुम्ब गावात एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या…

Read More

धुळे जिल्ह्यात ७ ट्रकद्वारे अवैधरित्या सुपारी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २.५ कोटींचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कामगिरी धुळे जिल्ह्यात सुपारीच्या अवैधरित्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल २.५२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून अवैध माल घेऊन जाणाऱ्या ७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले असून, कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात ३० एप्रिल…

Read More

खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील निगडी, प्राधिकरण येथे खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना विविध मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या स्वागतगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने…

Read More

मासिक पाळीमध्ये स्वयंपाक केल्यावरून वाद विकोपाला, 26 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूने खळबळ

जळगाव | जळगाव तालुक्यातील किनोद येथे २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) या महिलेचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.गुरुवारी (१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास…

Read More

नाशिकमध्ये भीषण अपघात : भरधाव पिकअपने दिली धडक,बहिणीने भावासमोर सोडला जीव

नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. दरम्यान, मागून…

Read More

“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!”अभियानाचा धुळे जिल्ह्यात शुभारंभ

आ.काशीराम पावरा, आ.मंजुळा गावित यांच्यासह लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष अभियानाची सुरुवात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . या अभियानाच्या निमित्ताने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग…

Read More
Back To Top