‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ निमित्त ९ एप्रिल रोजी सामूहिक णमोकार मंत्रजपाचे आयोजन
धुळे: भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या पावन प्रसंगी, जीतो लेडीज विंग धुळे आणि नवकार मंडळ संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या भक्तिभावाने ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती साक्री रोड येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या आध्यात्मिक कार्यक्रमाचा भव्य प्रारंभ ९ एप्रिल रोजी सकाळी…
